Meaning of Akaay : विरुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', पण याचा नेमका अर्थ काय?

स्टार क्रिकेटर विराट कोहली (virat kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharm) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय

Saurabh Talekar | Feb 20, 2024, 23:18 PM IST

Meaning of Akaay in Marathi : स्टार क्रिकेटर विराट कोहली (virat kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (anushka sharm) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय

1/6

मुलगा झाला हो...

विराट आणि अनुष्का आई-बाबा होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अशातच आता दोघांनी खुलासा करत मुलगा झाल्याचं सांगितलं.

2/6

वामिकाचा लहान भाऊ

15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ 'अकाय'चं स्वागत केलं असं अनुष्काने सोशल मीडियावर सांगितलं.

3/6

अकाय

पण विराट आणि अनुष्काने आपल्या मुलाचं नाव 'अकाय' (Akaay) असं का ठेवलं? असा सवाल विचारला जातोय.

4/6

अकाय चा अर्थ

अकाय चा अर्थ होतो... 'निराकार'... आकार आणि रूप नसलेला, शरीर नसलेला, असा अर्थ होतो.

5/6

तुर्की शब्द

अकाय हा शब्द मुळचा तुर्की शब्द आहे. तुर्की भाषेत याचा अर्थ चंद्राचा प्रकाश किंवा चंद्राकडून आलेला प्रकाश असा होतो.

6/6

वामिका

विराट आणि अनुष्का यांना वामिका नावाची मुलगी आहे. वामिक नावाचा अर्थ संस्कृतमध्ये देवी दुर्गा असा होतो.