Weekly Numerology : 'या' जन्मतारखेसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा भाग्यशाली; तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

Saptahik Ank jyotish 25 november to 1 december 2024 In Marathi : नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा अनेक योगांचा अतिशय शुभ आहे. त्यामुळे अंकशास्त्रानुसार मूलांक 2, 3 आणि 5 असलेल्या लोकांना प्रमोशन मिळणार आहे. तर विशेषत: मूलांक 6 असलेल्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीसह आर्थिक फायदा होणार आहे. अंकशास्त्रानुसार तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

नेहा चौधरी | Nov 24, 2024, 19:52 PM IST
1/9

मूलांक 1

या मूलांक असलेल्या लोकांच्या प्रेम जीवनात प्रेमच प्रेम असणार आहे. प्रेम जीवनात वैभव असणार आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होणार आहे. त्याशिवाय प्रकल्प यशस्वी होणार आहे. जर तुम्ही आर्थिक बाबतीत निष्काळजी असाल तर तुमचे खर्च जास्त असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याशी संबंधित चांगली बातमी कानावर पडणार आहे. प्रेमसंबंधातील नवीन सुरुवात तुमच्या जीवनात शांतता आणणार आहे.  आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जीवनात थोडे अस्वस्थ वाटणार आहे. 

2/9

मूलांक 2

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. जर तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचे पालन केलं तर या आठवड्यात तुमच्या प्रकल्पाशी संबंधित निर्णय घेतले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन विचाराने काही नवीन सुरू केल्यास यश मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. 

3/9

मूलांक 3

कामाच्या ठिकाणी प्रगती तर प्रकल्प यशस्वी होणार मात्र तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये काळ अनुकूल राहणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप लक्ष मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये या आठवड्यात खर्च वाढणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, एखाद्यापासून अंतर वाढणार किंवा तुम्हाला काही नुकसान सहन करावं लागणार आहे. 

4/9

मूलांक 4

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमधून काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. आर्थिक बाबींमध्ये खर्च जास्त राहाणार आहे. या आठवड्यात महिलांवर अधिक खर्च होणार आहे. प्रेम संबंधात तुम्हाला तुमच्या बाजूने अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. तरच तुम्हाला शांती मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी मिळणार आहेत. 

5/9

मूलांक 5

या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही केलेले कठोर परिश्रम भविष्यात यशाचे दरवाजे उघडणार आहे. आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. प्रेमसंबंधात अचानक कोणताही निर्णय घेतल्याने वेदना वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात शांती आणि आनंद असणार आहे. 

6/9

मूलांक 6

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुमच्या प्रकल्पाचे यश पाहून तुम्हाला आनंद होणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी सुख-समृद्धीची शुभ परिस्थिती निर्माण होत आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि गुंतवणुकीचे निर्णय घेतले तर तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि जीवनात निर्णय घेतला तर तुम्ही आनंदी व्हाल.

7/9

मूलांक 7

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. एखादा नवीन प्रकल्प तुम्हाला आकर्षित करणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रकल्पात यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत आर्थिक लाभासह व्यावसायिक सहली यशस्वी होणार आहे. प्रणय हळूहळू तुमच्या प्रेमसंबंधात प्रवेश करणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनशैलीत बरेच बदल होणार आहेत. हे देखील शक्य आहे की एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागण्याची शक्यता आहे. 

8/9

मूलांक 8

तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. पण ते तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असणार आहात. प्रेम संबंधात तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी प्रयत्न करणार आहात. तुम्ही त्या दिशेने नियोजनाच्या मूडमध्येही असणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ प्रतिकूल असणार आहे. पैसा खर्च होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी चर्चा करून परिस्थिती सोडवली तर बरे परिणाम मिळणार आहे. 

9/9

मूलांक 9

तुमच्या मेहनतीने तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. महिलांच्या पाठिंब्याने जीवनात सुख-समृद्धीची शुभ संधी मिळणार आहेत. या आठवड्यात आर्थिक खर्च अधिक असणार आहे. याकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहेत. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनातही अडचणी वाढणार आहे. परस्पर मतभेद देखील होऊ शकतात. या आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती प्रतिकूल होईल आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास चांगले होईल. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)