देशातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी महत्वाची अपडेट; 1 डिसेंबरपासून बदलणारा 'हा' नियम!

स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण घोटाळेबाज आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे. 

Pravin Dabholkar | Nov 24, 2024, 18:13 PM IST

TRAI New Rules:स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण घोटाळेबाज आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे. 

1/9

देशातील कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी महत्वाची अपडेट; 1 डिसेंबरपासून बदलणारा 'हा' नियम!

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

TRAI New Rules: देशभरात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोबाईल नसलेली माणस क्वचितच सापडतात. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट यासंदर्भात बदलणारे नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. असाच एक महत्वाचा नियम बदल होतोय.

2/9

अनेक प्रकारचे धोकेही वाढले

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेक प्रकारचे धोकेही वाढले आहेत. स्मार्टफोनने आपली कामे  अनेक कठीण सोपी केली आहेत. पण यासोबतच घोटाळेबाज आणि सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे.

3/9

ट्रायचे कठोर नियम

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

पण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) याविरोधात कठोरतेने काम करत असते. ट्रायने अलीकडच्या काळात फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

4/9

मोठा निर्णय

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी ट्रेसिबिलिटी लागू करण्याच्या सूचना ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दिल्या होत्या. हा एक मोठा निर्णय होता. 

5/9

तारीख अनेक वेळा बदलण्यात आली

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

ट्रायने ऑगस्टमध्ये व्यावसायिक मेसेज आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या होत्या. याच्या अंमलबजावणीची तारीख अनेक वेळा बदलण्यात आली होती.

6/9

ट्रायने वाढवली मुदत

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

दूरसंचार कंपन्यांना यापूर्वी TRAI OTP मेसेज ट्रेसेबिलिटी लागू करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनलच्या मागणीनंतर कंपनीने आपली मुदत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. 

7/9

अंतिम मुदत संपायला आली

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

आता अंतिम मुदत संपायला आली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना व्यावसायिकमेसेज आणि OTP मेसेज ट्रॅक करण्यासाठी ट्रेसेबिलिटी नियम लागू करावा लागणार आहे.

8/9

OTP येण्यासाठी लागू शकतो वेळ

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

Jio, Airtel, Vi आणि BSNL ने 1 डिसेंबरपासून ट्रेसिबिलिटी नियम लागू केल्यास, OTP मेसेज येण्यास वेळ लागू शकतो. तुम्ही बँकिंग किंवा रिझर्व्हेशनसचे काम करत असाल तर तुम्हाला OTT मिळण्यास वेळ लागू शकतो. 

9/9

नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश

TRAI New Rules for Jio Airtel VI Bsnl Users Tech news in Marathi

अनेक वेळा फ्रॉड लोकं बनावट OTP मेसेज पाठवून लोकांच्या हॅण्डसेटमध्ये प्रवेश मिळवतात. यामुळे लोकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.