Weekly Love Horoscope : शुक्राच्या शुभ प्रभावाने 'या' राशींच्या लोकांचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक, जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य

Weekly Love Horoscope 10 to 16 April 2023 : शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे हा आठवड्या काही राशींसाठी प्रेमच प्रेम घेऊन आला आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमचा आठवडा कसा असेल तर जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

नेहा चौधरी | Apr 09, 2023, 09:33 AM IST

Weekly Love Horoscope 10 to 16 April 2023 in marathi : हा आठवडा खूप खास असणार आहे. कारण या आठवड्यात मालव्य राजयोग तयार होतं आहे. जो भौतिक सुख, प्रेम आनंद देणारा असतो. तर सूर्य आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे हा आठवड्या काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमच प्रेम घेऊन आला आहे. चला तर जाणून घेऊयात हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधित कसा असेल. (Weekly Love Horoscope 10 to 16 April 2023 Shukra Gochar 2023 romantic romance love rashifal all zodiac signs in marathi)

1/12

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. जोडीदारासोबत परस्पर प्रेम वाढणार आहे. तुम्ही अनेक आनंदाचे क्षण या आठवड्यात घालविणार आहात. एखाद्या स्त्रीच्या मदतीने तुमच्या प्रेम संबंधात मजबूती येणार आहे. 

2/12

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात प्रेमाबद्दल जरा काळजीपूर्वक वागायला हवं. जोडीदाराबरोबर कुठल्या तरी कारणामुळे अंतर वाढू शकतं. मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्ही जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालविणार आहात.

3/12

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्यात लव्ह लाइफमध्ये काळजी घेण्याची गरज आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, अन्यथा तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. अहंकारामुळे तुमच्या नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे. 

4/12

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लव्ह लाइफसाठी चांगला आहे. त्यांचं परस्परामधील प्रेम अधिक मजबूत होणार आहे. प्रेम जीवनात आनंदासोबत विश्वास वाढणार आहे. तुम्ही या आठवड्यात जोडीदाराकडे विशेष लक्ष देणार आहात. 

5/12

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने शुभ असणार आहे. प्रेमसंबंधात मजबूतीसोबत रोमँटिक क्षण तुम्ही घालविणार आहात. स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास प्रेम जीवन आनंदच आनंद येणार आहे. 

6/12

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आनंद घेऊन आला आहे. कारण त्यांच्या लव्ह लाइफमध्ये रोमान्स असणार आहे. प्रेमासंबंधात तुम्हाला या आठवड्यात सकारात्मक बातमी मिळणार आहे. जोडीदारासोबत वेळ घालविल्यामुळे तुमचं प्रेम मजबूत होणार आहे. 

7/12

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आंबट आणि गोड अनुभव देणारा असणार आहे. प्रेमात खट्टी मिट्टी बात होणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक निर्णय घेणं तुमच्या प्रेमसंबंधासाठी चांगल ठरेल. मात्र या आठवड्यात जोडीदारासोबत घालवलेला वेळ तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव देणारा ठरणार आहे. 

8/12

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा हा आठवडा लव्ह लाईफदृष्टीने रोमँटिक असणार आहे. प्रेम जीवनात फक्त आनंदच आनंद असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाने जोडीदारावर प्रभाव पडणार आहे. संवादातून प्रेम मजबूत होणार आहे.   

9/12

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांचं या आठवड्यात प्रेमसंबंध जरा कठीण काळातून जाणार आहे. प्रेमप्रकरणाबद्दल काळजीपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. योग्य निर्णय घेतल्यास प्रेमसंबंधात चांगले परिणाम दिसून येईल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. 

10/12

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकाचं लव्ह लाईफ या आठवड्यात जरा तणावपूर्ण राहणार आहे. त्यामुळे मानसिक त्रास होणार आहे. मात्र आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचं लव्ह लाइफ चांगल होणार आहे. विश्वास आणि संवाद या दोन गोष्टींमुळे जोडीदारासोबतचं प्रेम अधिक घट्ट होणार आहे.   

11/12

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. जोडीदाराच्या सहवासात आनंद आणि मनशांती लाभणार आहे. तुमचं लव्ह लाइफ रोमान्सने भरलेलं असणार आहे. आठवड्याच्या शेवटी नवीन विचार तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुख घेऊन येणार आहे. 

12/12

मीन (Pisces)

हा आठवड्या या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. प्रेम जीवनातही आनंद असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा योग आहे. त्यामुळे तुमचं प्रेम मजबूत होणार आहे. तुमच्या लव्ह लाइफमध्ये सुंदर भविष्य असणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)