World Cup: आम्ही काही जाणूनबुजून...; सचिन- द्रविडच्या नावावरून रचिनचं नाव ठेवण्याबाबत त्याच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

World Cup 2023: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या टीमचा खेळाडू रचिन रविंद्रची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावावरुन त्याचे नाव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत आता त्याच्या वडिलांनी खुलासा केला आहे.  

Nov 15, 2023, 14:05 PM IST
1/6

पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणारा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रविंद्र टीमसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

2/6

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्या नावावरुन त्याचं ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. मात्र यामागचे सत्य काय आहे, हे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

3/6

राहुल आणि सचिन तेंडुलकरच्या नावावरुन त्याचं नाव ठेवण्यात आलंय. रचिनच्या नावाची कहाणी वर्ल्डकपनंतर काही दिवसांतच भारतातील क्रिकेटप्रेमींना ही गोष्ट कळाली.

4/6

एका वेबसाईटशी बोलताना रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती म्हणाले की, रचिनचा जन्म झाला, तेव्हा त्यांच्या पत्नीने रचिन हे नाव सुचवलं. त्यावेळी आम्ही नावावर जास्त चर्चा केली नाही. 

5/6

रचिन हे नाव चांगलं आणि सोपं होतं. म्हणून आम्ही हे नाव ठेवलंय, असंही त्याचे वडील म्हणाले.

6/6

राहुल आणि सचिनच्या नावांचं हे मिश्रण असल्याचं आम्हाला नंतर समजलं. आमच्या मुलाने क्रिकेटर व्हावं अशी आमची इच्छा होती. परंतु, आम्ही त्याचं नाव जाणूनबुजून ठेवले नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.