IPL 2024 Final : वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी, 'या' दोन टीम खेळणार आयपीएलची फायनल

Wasim Akram IPL 2204 Final Prediction : आयपीएलच्या प्लेऑफच्या लढतींना आजपासून सुरूवात होतीये. पहिला क्वालिफायर सामना केकेआर आणि हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. तर एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. त्यावर आता वसीम अक्रमने भविष्यवाणी केलीये.

Saurabh Talekar | May 21, 2024, 15:45 PM IST
1/7

हर्षित राणा

केकेआरचा संघ यंदा नंबर-1 वर राहिलाय. त्याला कारण त्यांची गोलंदाजी आहे. चक्रवती असो वा हर्षित राणा यांनी अफलातून कामगिरी केलीये, असं अक्रम म्हणतो.

2/7

एक्स फॅक्टर

केकेआरचा ऑलराऊंडर सुनील नारायण त्यांच्यासाठी एक्स फॅक्टर ठरलाय. तसेच रसेलने देखील 15 विकेट्स घेतल्या आहेत.

3/7

केकेआर

स्टार्ककडे एकट्याच्या जिवावर सामना जिंकण्याची क्षमता आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की, केकेआर यंदा फायनलमध्ये पोहोचेल, असं वसीम अक्रम म्हणतो.

4/7

आरसीबी

केकेआरसह आरसीबी देखील आता धोकादायक टीम झालीये. आत्ता जशी कामगिरी त्यांची राहिलीये, त्यामुळे आता ते फानयलमध्ये पोहोचू शकतात, असंही अक्रम म्हणतो.

5/7

ग्लेन मॅक्सवेल

मला वाटतंय की ग्लेन मॅक्सवेल पुन्हा फॉर्ममध्ये येणं हे इतर संघासाठी घातक ठरू शकतं. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना अजून दोन सामने जिंकावे लागतील.

6/7

मॅचविनर

आरसीबीकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. चांगले फिनिशर आहेत. तसेच ओपनिंग देखील त्यांची चांगली आहे, असंही अक्रम याने म्हटलंय. 

7/7

विराट

एवढंच नाही तर, विराटचा फॉर्म अफलातून आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आरसीबी यंदा फायनलमध्ये पोहोचेल, असंही वसीम अक्रमने म्हटलं आहे.