Vande Bharat Train : सर्वात कठीण अशा कसारा घाटात 'वंदे भारत ट्रेन'चा सराव; मुंबई ते शिर्डीचा प्रवास सुसाट
मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
Mumbai Shirdi Vande Bharat Express : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चे 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या रेल्वेने इगतपुरी ते मुंबई ट्रायल करत आपल्या वेगवान प्रवासाचा सराव केला आहे. या प्रवासादरम्यान कसारा घाट सर्वात कठीण समजला जातो. नेहमीच्या एक्सप्रेसला पुढे आणि मागे दोन इंजिन लावावे लागतात. त्यामुळे वंदे भारत ट्रेन आपला वेगवान प्रवास किती कायम राखू शकते याचा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून घेतला गेला.



