जगातील सर्वात मोठा आशिक! 200 हून अधिक महिलांशी अफेअर, 11 व्या वर्षी पहिलं प्रेम; कॅसानोव्हा होता तरी कोण?

Pravin Dabholkar | Feb 14, 2025, 17:15 PM IST

casanova love life: जगात असाही एक आशिक होऊन गेला ज्याचे एक नव्हे तर तब्बल 200 हून अधिक अफेअर्स होते.

1/8

जगातील सर्वात मोठा आशिक! 200 हून अधिक महिलांशी अफेअर, 11 व्या वर्षी पहिलं प्रेम; कॅसानोव्हा होता तरी कोण?

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

casanova love life: आज 14 फेब्रुवारी. जगभरात प्रेम साजरे करण्याचा दिवस. आजच्या दिवसाचा इतिहास, महत्व, संत व्हॅलेंटाइन कोण होते? याची माहिती तुम्हाला मिळालीच असेल. दरम्यान आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या आशिकाबद्दल जाणून घेऊया.

2/8

200 हून अधिक अफेअर्स

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

जगात असाही एक आशिक आहे, ज्याचे एक नव्हे तर तब्बल 200 हून अधिक अफेअर्स होते. आपल्या एका आयुष्यात त्याने इतक्या महिलांवर प्रेम केले. कॅसानोव्हा असे त्याचे नाव होते. त्याने आपल्या आत्मचरित्रात प्रेमावर खूप काही लिहिलंय.

3/8

200 हून अधिक महिलांवर प्रेम

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

प्रेमासाठी कोणताही दिवस नसतो. प्रेमी नेहमीच एकमेकांसाठी आपले जीवन अर्पण करतात. प्रेम हे एकदाच होतं, असं म्हणतात.  पण कॅसानोव्हाने ते 200 हून अधिकवेळा केल. याची जगासमोर कबुलीदेखील दिली. पण हे कसं शक्य झालं? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

4/8

जगातील सर्वात मोठा प्रेमी

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

कॅसानोव्हाला जगातील सर्वात महान प्रेमी म्हटले जाते. त्यांचा जन्म 1725 मध्ये इटलीतील व्हेनिस येथे झाला. त्याचे पालक थिएटर कलाकार होते.

5/8

वयाच्या 11 व्या वर्षी पहिलं प्रेम

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

कॅसानोव्हा वयाच्या 11 व्या वर्षी तो पहिल्यांदा प्रेमात पडला. त्याचे 13 ते 40 वर्षे वयोगटातील महिलांशी संबंध होते. कॅसानोव्हाचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते. तो एक पादरीदेखील होता. त्याला कायद्याचेही चांगले ज्ञान होते.

6/8

प्रेमात मौन निरुपयोगी

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

कॅसानोव्हाने 'द स्टोरी ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्रात लिहिले. त्यात तो म्हणतो, 'अशी कोणतीही प्रामाणिक महिला नाही जिच्या हृदयात स्वतःसाठी जागा बनवता येत नाही.' कॅसानोव्हाच्या मते, प्रेम करण्यासाठी शब्द असले पाहिजेत. गप्प राहिल्याने प्रेमाचे दोन भाग होतात.

7/8

चर्चमध्ये नोकरी

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

कॅसानोव्हाने गणित, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचाही अभ्यास केला होता. त्याची पहिली नोकरी चर्चमध्ये होती. येथे त्याने  बंदी घातलेली पुस्तके वाचण्याची परवानगी पोपकडे मागितली होती.

8/8

गेला दूरच्या प्रवासाला

Valentine Day Special casanova love life Relationship marathi news

कॅसानोव्हाने त्याच्या लेखन कौशल्याचा वापर करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गुप्त प्रेमपत्रे लिहिली. त्याने सैन्यातही सेवा केली, वकील झाला आणि ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलिन वादक म्हणून काम केले. तो एक व्यावसायिक जुगारी बनला आणि अखेर युरोपच्या एका लांब प्रवासाला गेला.