Urfi Javed : वाद पेटणार? भगव्या रंगांच्या ड्रेसमध्ये उर्फीकडून दीपिकालाही टक्कर
Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र आता तर उर्फीने कहर केला असून भगव्या रंगावरून दीपिकालाही टक्कर दिली आहे.
Deepika Padukone's : पठाण चित्रपटाचं गाणं बेशरम रंग प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने बराच वाद सुरू झाला. त्यानंतर सोशल मीडीयावरून या चित्रपटाला खूप विरोध केला जात होता. काही भाजप नेत्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर सेन्सॉर बोर्डाने ही गाण्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना सोशल मीडिया प्रभावशाली आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेदने भगव्या पोशाखात तिची किलर स्टाईलचे फोटो, व्हिडीओ शेअर केला.



