मालदीव की लक्षद्वीप, फिरण्यासाठी कोणती जागा स्वस्त आणि मस्त? 5 दिवसांच्या पर्यटनासाठी किती बजेट

Lakshadweep Vs Maldives: सोशल मीडियावर सध्या लक्षद्वीप विरुद्ध मालदीव असा वाद सुरु आहे. समुद्रकिनारी फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी या दोन्ही जागा स्वप्नाहून सुंदर आहेत. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत जायचं असेल तर कोणत्या ठिकाणी जाल याबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत. 

राजीव कासले | Jan 08, 2024, 18:08 PM IST
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मालदीव सरकारमधील एका मंत्र्याने यावर वादग्रस्त टीका केली. त्यामुळे सोशल मीडियावर लक्षद्वीप विरुद्ध मालदीव असा वाद रंगला आहे. गेल्या काही दिवसात देशातूनच नाही तर जगभरातील अनेक देशातून लक्षद्वीपबद्दल माहिती मिळवली जातेय. 

2/7

मालदीव हे अनेक सेलिब्रेटिंचं फिरण्याचं आवडतं ठिकाण आहे. पण वादानंतर अनेक भारतीयांनी मालदीवचं पर्यटन रद्द केलं आहे. अशात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, फिरण्यासाठी मालदीव स्वस्त आहे की लक्षद्वीप. दोघांपैकी कोणतं ठिकण बजेट फ्रेंडली आहे. 

3/7

लक्षद्वीप आणि मालदीप या दोनही जागा समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये एकूण 36 आयलँड आहेत. तर मालदीवमध्ये तब्बल 300 आयलँड आहेत. मालदीवमध्ये आरामदायी सुट्टी घालवण्यासाठी 5-7 दिवसांची गरज आहे. तर लक्षद्वीपमध्ये तुम्ही 5-6 दिवसात सुट्टी एन्जॉय करु शकता.

4/7

मालदीव फिरण्यासाठी तुमच्याकडे 2 ते 5 लाखांचं बजेट असणं गरजेच आहे. तुम्ही महागातलं रिसॉर्ट बूक केलंत तर हे बजेट आणखी वाढू शकतं. आपल्या मनपसंत रिसॉर्टवर जाण्यासाठी सीप्लेन किंवा स्पीडबोट इथं उपलब्ध आहे. यासाठी जवळपास 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. 

5/7

मालदीवमध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि इतर अॅक्टिव्हिटीजसाठी 35,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंत खर्च येतो. यात डायव्हिंग, पॅरासेलिंग, कयाकिंग, जेट-स्किईंग, काईट सर्फिंग, फन ट्यूबिंग, वेकबोर्डिंग, स्पा ट्रीटमेंट, सँडबँक पिकनिक इत्यादी गोष्टींचा आनंद लूटू शकता. 

6/7

लक्षद्वीप हे शांत आणि आल्हाददायक समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. स्वच्छ आणि पांढरं शुभ्र पाणी, सफेद वाळू, आणि समुद्र किनारे जोडप्यांसाठी रोमँटिक ठिकाण आहे. ट्रॅव्हलिंग सोडून चार दिवस आणि 3 रात्रींच्या पर्यटनासाठी 20 हजारांच्या आसपास खर्च आहे. तर कावरत्ती, कल्पेनी आणि मिनिकॉय बेटांवर 5 दिवसांच्या सहलीसाठी एका व्यक्तीसाठी 37,500 खर्च येतो. 

7/7

लक्षद्वीपमध्ये सनबाथचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात. याशिवाय स्नॉकर्लिंग, स्कूबा डायव्हिंग आणि निसर्गाची मुक्तहस्ताने केलेली उधळण तुमचा प्रवास यादगार  बनवेल हे निश्चित.