Toyota च्या नव्या कारचा फर्स्ट लूक समोर, फीचर्स, किंमत सर्वकाही जाणून घ्या

Toyota लवकरच Innova कारचा इलेक्ट्रिक वर्जन (Toyota Innova EV) बाजारात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी कंपनीने एका ऑटो इव्हेंटमध्ये Innova EV चे पहिले लुक सादर केले होते. नुकत्याच पार पडलेल्या इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय मोटर शो  मध्येही ही कार पुन्हा प्रदर्शित करण्यात आली.

Feb 19, 2025, 17:58 PM IST
1/6

टोयोटा इनोवा ईवी मध्ये 59.3 kWh च्या लिथियम-आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या बॅटरीमध्ये कारची 179 hp पॅवर असलेले 700 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या कारमधील बॅटरीला AC आणि DC दोन्ही चार्जिंग सिस्टम्सच्या मदतीने चार्ज करता येईल.  

2/6

Toyota ने या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक सुधारणा तसेच बदलही केले आहेत. नव्या मॉडेलमध्ये आणखी आधुनिक फीचर्स आणि स्टायलिश डिझाइन पाहायला मिळतील. कंपनीने Innova EV बद्दल काही महत्त्वाची माहितीही दिली आहे. यामध्ये कारच्या परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानावर विशेष भर दिला आहे. ही कार भारतीय बाजारात केव्हा उपलब्ध होईल, याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, लवकरच ही अलीशान कार बाजारात येण्याची शक्यता आहे.  

3/6

टोयोटा इनोवाच्या डिजाइनमध्ये देखील कंपनीने भरपूर बदल केले आहेत. कारमध्ये लागलेल्या ग्रिल जवळपास अँगुलर हेडलाइट्स लावलेल्या आहेत.  

4/6

विशेष म्हणजे कंपनीने कारच्या हेडलाइट्समध्ये नव्या एलईडी सिग्नेचर लाईट्सचा वापर केला आहे. त्याशिवाय या इलेक्ट्रिक कारसोबत कंपनीने 16 इंचचे खास अलॉय व्हील्ससुद्धा दिले आहेत.  

5/6

या कारमध्ये मागे प्रवाशांना बसण्यासाठी भरपूर जागा देण्यात आली आहे.  

6/6

या गाडीमध्ये एलईडी रियर टेल लाइट आहेत आणि त्यांच्या मागे एक लाइट स्ट्रिप आहे. या गाडीमध्ये वायरलेस चार्जर, एम्बिएंट लाइटिंग त्यासोबतच ड्युअल-टोन इंटीरियर आहे.