लाँचिंगच्या आधीच Maruti Suzuki Dzire कारने विक्रम रचला; ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये मिळाले रेकॉर्डब्रेक रेटिंग

सनरुफ, 360 डिग्री कॅमेऱ्यासारखे लेटेस्ट फिचर्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  जबरदस्त मायलेज या कारमध्ये मिळणार आहे.  

| Nov 08, 2024, 20:25 PM IST

Maruti Suzuki Dzire Sunroof : मारुती सुझुकीची Maruti Suzuki Dzire कार ही सर्वात लोकप्रिय सेदान कार नव्या रुपात मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहे. कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच होणार आहे.  लाँचिंगच्या आधीच maruti suzuki dzire कारने विक्रम रचला रचला आहे.  ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये Maruti Suzuki Dzire ने जबरदस्त रेटिंग मिळवले आहे. 

1/8

 मारुती कंपनीच्या सर्वात लोकप्रिय Maruti Suzuki Dzire  कारच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये लग्जरी फिल मिळणार आहे.  लाँचिंग आधीच कारने  ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये जबरदस्त रेटिंग्ज मिळवले आहे.   

2/8

11 नोव्हेंबर रोजी ही कार लाँच होणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर आणि अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त 11,000 रुपयात या कारचे बुकिंग करता येणार आहे. 

3/8

नवीन स्विफ्टचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 24.8 किमी प्रति लीटर मायलेज देईल. पेट्रोल एएमटी व्हेरिएंट प्रति लिटर 25.75 किमी मायलेज मिळेल असा दवा कंपनीने केला आहे.  Dezire चे CNG व्हेरिएंट लाँच केले जाईल. 

4/8

360-डिग्री कॅमेरा, ट्राय-एरो एलईडी टेललाइट्स, बूटलिडवर इंटिग्रेटेड स्पॉयलर तसेच इंटेरियरमध्ये अपहोल्स्ट्री आणि डार्क कलरची डॅशबोर्ड अशी थीम मिळेल. 

5/8

नव्या कारमध्ये  मोठ्या ग्रिल, फुल LED हेडलॅम्प, एलईडी फॉग लाइट्स, नवीन फ्रंट आणि रियर बंपर आणि नवीन अलॉय व्हील यांचा समावेश आहे. 

6/8

यापूर्वी मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट SUV मारुती ब्रेझ या कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4-स्टार रेटिंग मिळाले होते. 

7/8

 ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश टेस्टमध्ये Maruti Suzuki Dzire कारला  5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. 5 स्टार रेटिंग मिळवणारी सुझुकीची ही पहिलीच कार आहे.   

8/8

नवी Maruti Suzuki Dzire  टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ या कारना टक्कर देणार आहे. व्हायरल फोटोनुसार नव्या Maruti Suzuki Dzire मध्ये सनरुफ मिळणार आहे.