मकरसंक्रातीच्या हळदी कुंकवात द्या Unique वाण; कमी खर्चात भन्नाट पर्याय

मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांती म्हणजे  महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रणाचे आकर्षण म्हणजे वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार आणि कोणती वस्तू देता येईल? हे अनेकदा कळत नाही. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाण म्हणून कोणत्या वस्तु देता येतील. 

| Jan 11, 2025, 13:33 PM IST

Haldi Kunku Vaan Ideas: मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांती म्हणजे  महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रणाचे आकर्षण म्हणजे वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार आणि कोणती वस्तू देता येईल? हे अनेकदा कळत नाही. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाण म्हणून कोणत्या वस्तु देता येतील. 

 

1/8

2/8

 हळदी कुंकवाच्या दिवशी वाण म्हणून तुम्ही पर्सची निवड करु शकता. हल्ली बाजारात 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत पर्स मिळतात.

3/8

संक्रांतीला तुम्ही काचेच्या बरण्यादेखील वाण म्हणून देऊ शकतात. 15 रुपयांपासून लहान बरण्या मिळतात तर 50 रुपयांपासून मोठ्या व छान डिझाइनच्या बरण्या मिळतात.   

4/8

साडी कव्हर, ब्लाउजचे कव्हर, पिलो कव्हर असे पर्यायदेखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. 50 रुपयांपासून या सर्व वस्तू सुरू होतात. 

5/8

नेलपेंट, फेस मास्क, काजळ अशा सर्व वस्तुंचा एक किट तुम्ही महिलांना वाण म्हणून देऊ शकतात. 

6/8

 वाण म्हणून तुम्ही कापडी पिशवीदेखील देऊ शकतात. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवी देऊ शकतात.   

7/8

हळदी कुंकुसाठी तुम्ही कडे किंवा ब्रेसलेटदेखील घेऊ शकतात. अॅडजेस्टेबल ब्रेसलेटदेखील बाजारात मिळतात. 

8/8

हळदी कुंकुसाठी तुम्ही चमचे ठेवायचे स्टीलचे स्टँड किंवा घरगुती उपयोगी वस्तूदेखील देता येतील.