PHOTO : 11329 किलो सोनं, बँकेत ₹1167 कोटी अन् ₹18000 कोटींची एकूण संपत्ती; भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घ्या
तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केल्यानंतर तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झालाय. हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहे.
1/9

आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला डोंगरावर वसलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. हे भगवान विष्णूचे एक रुप व्यंकटेश्वरला समर्पित असून श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, तिरुमाला मंदिर, तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत जंगलवाटे घाटातून रस्ताही जातो. शिवाय डोंगऱ्याच्या पायथ्यापासून तुम्ही मंदिरापर्यंत पाया चढूनही जाऊ शकता.
2/9

केरळमधील त्रिवेंद्रम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर पहिल्या क्रमांकावर मग तिरूपती बालाजी हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. सध्या हे मंदिर तिथल्या प्रसादामुळे चर्चेत आले आहेत. यावर्षी तिरुपती मंदिर ट्रेस्टने 5000 कोटींची बजेट सादर केलं. तर या मंदिराची एकूण संपत्तीचा आकडा ऐकून तुम्ही अवाक् व्हाल कारण देशातील प्रमुख सूचीबद्ध कंपन्यांच्या मूल्यापेक्षा जास्त नोंदविण्यात आलय.
3/9

मंदिराने 2023-24 या आर्थिक वर्षात विविध राष्ट्रीयीकृत बँकांमधील TTD च्या एकूण मुदत ठेवी रु. 18,000 कोटींहून अधिक जमा केल्या आहेत. या काळात मंदिराने 1,031 किलोहून अधिक सोने जमा करून इतिहास रचला. गेल्या तीन वर्षात विविध बँकांमध्ये 4,000 किलोपेक्षा जास्त सोने जमा झाले आहे. ज्यामुळे TTD चा एकूण सोन्याचा साठा 11,329 किलो एवढा गेलाय.
4/9

TTD अंतर्गत 75 ठिकाणी 6,000 एकर वनजमीन आणि 7,636 एकर स्थावर मालमत्तादेखील आहे. या अंतर्गत 1,226 एकर शेतजमीन तर 6,409 एकर अकृषिक जमीन मंदिराच्या नावावर आहे. देशभरात TTD आणि 535 इतर मालमत्तांच्या सहकार्याने 71 मंदिरं आहेत. यापैकी 159 मालमत्ता भाडेतत्त्वावर असून, यातून वार्षिक 4 कोटी रुपयांचे उत्पन्न मंदिराला मिळतात.
5/9

6/9

7/9

मंदिराच्या उत्पन्नाचा तिसरा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे प्रसादमचे उत्पन्न. पवित्र अन्नातून 600 कोटी रुपयांची कमाई होते. जी गेल्या वर्षी 550 कोटी रुपये होती. याशिवाय 347 कोटी रुपयांची प्रारंभिक रोख आणि बँक ठेवी आहेत. शिवाय 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्समध्ये 180 कोटी रुपयांची घट झालीय.
8/9

9/9
