याला म्हणतात साधेपणा.. 1.10 लाख कोटींचा मालक पण मोबाईलही वापरत नाही! 6 लाखांच्या सॅण्ट्रोतून करतो प्रवास
Man Owns 1.10 Lakh Crore: सामान्यपणे संपत्ती आली म्हणजे आलिशान आयुष्य आणि महागड्या गोष्टी ओघाने आल्याच असं समजलं जातं. मात्र हे असं सरसकट असेल असं नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने शून्यातून 1.10 लाख कोटींचं सम्राज्य उभं केलं असूनही ती अगदी सर्वसामान्याप्रमाणे जगते. जाणून घेऊयात कोण आहे ही व्यक्ती आणि ती नेमकं काय करते याबद्दल...
Swapnil Ghangale
| Aug 29, 2024, 16:00 PM IST
1/10

संपत्ती आली की आलिशान जीवनशैली आली असं मानलं जातं. मात्र आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत तो या गोष्टीला अपवाद आहे. 1.10 लाख कोटी रुपयांची कंपनीची स्थापना करणारी व्यक्ती छोट्याश्या घरात राहते, अवघ्या 6 लाखांची कार चालवते इतकेच काय त्याच्याकडे साधा मोबाईल फोनही नाही असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. भारतात असा एक उद्योगपती आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. हा उद्योगपती कोण? ते नक्की काय करतात हेच जाणून घेऊयात...
2/10

3/10

4/10

5/10

आर्थिक क्षेत्रामध्ये राममूर्ती त्यागराजन यांनी निवडलेला आगळावेगळा दृष्टीकोन त्यांच्या यशसाठी कारणीभूत ठरला. राममूर्ती त्यागराजन यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका विमा कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून केली. मात्र पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या बँका या मोठ्या लोकसंख्येच्या गरजांकडे दूर्लक्ष करत असल्याचं राममूर्ती त्यागराजन यांना जाणवलं.
6/10

बँका सामान्यपणे कर्ज नाकारतं अशा लोकांमध्ये ट्रक चालक आणि इतर अल्प उत्पन्न गटातील लोकांकडे बँका दूर्लक्ष करतात हे राममूर्ती त्यागराजन यांना प्रकार्षाने दिसून आलं. या लोकांना कर्ज उपलब्ध करुन देत त्यामधून काहीतरी वेगळं निर्माण करता येईल असं जाणवल्यानंतर राममूर्ती त्यागराजन या लोकांना कर्ज देऊ लागले.
7/10

8/10

9/10
