एक्झिट पोलमध्ये हे १० मोठे चेहरे पराभवाच्या वाटेवर

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलचे आकडे समोर आले. ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार अशी शक्यता वर्तवण्य़ात आली. एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलचे आकडे अनेकांना हैराण करणारे आहेत. महत्त्वाचं म्हणजे अनेक मोठे चेहरे हे या एक्झिट पोलमध्ये पराभूत होताना दिसत आहेत.

shailesh musale | May 20, 2019, 17:37 PM IST
1/11

उत्तर प्रदेशच्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून सपाच्या डिंपल यादव यांचा पराभव होताना दिसत आहे. या जागी भाजपच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2/11

मैनपुरी लोकसभा मतदारसंघात सपाचा प्रभाव आहे. पण येथे मुलायम सिंह यांचा विजय कठीण दिसत आहे.

3/11

फतेहपूर-सिक्री लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राज बब्बर पराभूत होताना दिसत आहेत. या जागी भाजपच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता आहे.

4/11

अमेठीतून ३ वेळा विजयी होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी देखील यंदाची निवडणूक सोपी नाही. त्यांचा विजय देखील कठीण असल्य़ाचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

5/11

पटना मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा यांचा देखील पराभव होण्याची शक्यता आहे. येथे भाजपचा विजय होण्याची शक्यता आहे.

6/11

पाटलीपुत्र मतदारसंघातून आरजेडीच्या उमेदवार आणि लालू यादव यांची लेक मीसा भारती यांना देखील पराभवाचा धक्का बसण्य़ाची शक्यता आहे.

7/11

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारी आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा देखील पराभव होण्याची शक्यता आहे. भाजपच्या विजयाची येथे शक्यता आहे.

8/11

पूर्ण दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या आतिशी यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. येथून माजी क्रिकेटर गौतम गंभीर विजय होऊ शकतो.

9/11

कर्नाटकमधील तुमकुर लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांना देखील विजय सोपा दिसत नाही. येथून भाजपच्या जीएस बसवाराज यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

10/11

भोपाळमधून देखील काँग्रेससाठी चांगली बातमी नाही. कारण येथून दिग्विजय सिंह यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंग येथे विजयी होताना दिसत आहे.

11/11

बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गिरिराज सिंह हे सीपीआयच्या तिकीटावर लढणाऱ्या कन्हैया कुमारवर भारी पडताना दिसत आहेत.