Cannes 2019: सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याची लेकीसह 'कान'ला हजेरी

May 20, 2019, 10:10 AM IST
1/5

Cannes 2019: सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याची लेकीसह 'कान'ला हजेरी

नवी दिल्ली : 'आँखों की गुस्ताखियाँ... माफ हो...' हे गाणं अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासाठी पूर्णपणे लागू आहे. सध्याच्या घडीला अचानक ऐश्वर्याच्या सौंदर्याची बाब अधोरेखित करण्यास कारण ठरत आहे ते म्हणजे ७२ व्या 'कान' चित्रपट महोत्सवातील तिची उपस्थिती. हिना खान, प्रियांका चोप्रा, हुमा कुरेशी, दीपिका पदुकोण या बॉलिवूड सौंदर्यवतींमागोमाग अखेर ऐश्वर्यानेही या सोहळ्याला उपस्थिती लावली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

2/5

Cannes 2019: सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याची लेकीसह 'कान'ला हजेरी

luminious neon Jean-Louis Sabaji Couture gown या अशा रुपात ती आपल्या लाडक्या लेकीसह म्हणजेच आराध्यासह या सोहळ्याला उपस्थित राहिली. आराध्याही आईप्रमाणेच अगदी सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

3/5

Cannes 2019: सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याची लेकीसह 'कान'ला हजेरी

मागील काही वर्षांमध्ये ऐश्वर्याने कानच्या रेड कार्पेटसाठी निऑन रंगांना प्राधान्य दिलं होतं, त्याचप्रमाणे यंदाही तिने अशाच प्रकारचा रंग निवडला. ज्यामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

4/5

Cannes 2019: सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याची लेकीसह 'कान'ला हजेरी

प्रतिवर्षी 'कान' सोहळ्याला उपस्थित राहणारी ही सौंदर्यवती तिच्या उपस्थितीने साऱ्या जगातत लक्ष वेधते. यंदाचा तिचा लूकही असाच लक्षवेधी ठरला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

5/5

Cannes 2019: सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याची लेकीसह 'कान'ला हजेरी

मुख्य म्हणजे ऐश्वर्याप्रमाणेच तिची मुलगी, आराध्या बच्चन हिसुद्धा 'कान'च्या निमित्ताने सर्वांचच विशेष लक्ष वेधून गेली. त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाच्या वर्षी 'कान'मध्ये भारतीय सौंदर्यवतींचाच डंका वाजला, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)