Photo : एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेले 'हे' 5 स्टार क्रिकेटर्स मेगा ऑक्शनमध्ये राहतील Unsold

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. यात जवळपास 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असून यात अनेक नव्या तसेच दिग्गज स्टार खेळाडूंचा सहभाग आहे. एकेकाळी आयपीएलचं मैदान गाजवणारे दिग्गज क्रिकेटर यंदा आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये Unsold राहू शकतात. 

| Nov 18, 2024, 13:28 PM IST
1/7

केन विल्यम्सन :

केन विल्यम्सन : न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटर केन विल्यम्सन हा 2022 मध्ये 14 कोटींनी रिटेन झालेला सर्वात महागडा खेळाडू होता, गुजरात टायटन्सने मागच्या ऑक्शनमध्ये त्याला 2 कोटींच्या बेस प्राईजकर खरेदी केलं होतं. मात्र यंदा तो Unsold राहू शकतो. 

2/7

अजिंक्य रहाणे :

 एकेकाळी राजस्थान रॉयल्सच्या संघाचा कॅप्टन राहिलेला क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने मेगा ऑक्शनमध्ये स्वतःला 1.5 कोटींना रजिस्टर केलं आहे.  मात्र यंदा अजिंक्य Unsold राहू शकतो. 2024 मध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होता. मात्र त्याला रिटेन करण्यात आलं नाही. 

3/7

स्टीव्ह स्मिथ :

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा 2021 पासून आयपीएलचा भाग राहिलेला नाही. यंदा त्याने मेगा ऑक्शनमध्ये स्वतःच रजिस्ट्रेशन केलं आहे. मात्र त्याच्यासाठी कोणतीही आयपीएल टीम बोली लावेल याची शक्यता कमी आहे. 

4/7

ईशांत शर्मा :

आयपीएल 2023 आणि 2024 मध्ये ईशांत शर्माने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चांगली कामगिरी केली. परंतु ३६ वर्षांच्या ईशांतचं वाढत वय पाहता त्याच्यावर आयपीएल टीम बोली लावतील याची शक्यता कमी आहे. 

5/7

उमेश यादव :

 उमेश यादवला खरेदी करण्यासाठी गुजरात टायटन्सने मागच्यावर्षी 5.6 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र उमेश गोलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे 37 वर्षांचा गोलंदाज हा मेगा ऑक्शनमध्ये Unsold राहू शकतो. 

6/7

आयपीएल ऑक्शन दुसऱ्यांदा परदेशात आयोजित करण्यात आले असून 2024 चं मिनी ऑक्शन सुद्धा दुबईत झाला होता. IPL मेगा ऑक्शनसाठी जगभरातून एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली. आता ही यादी आयपीएल आणि फ्रँचायझी यांच्यातील चर्चेमुळे कमी होणार आहे. प्रत्यक्ष ऑक्शनसाठी 500 ते 600 खेळाडू निवडले जाऊ शकतात. नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंमध्ये 320 कॅप खेळाडू, 1224 अनकॅप खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्ष आयपीएलसाठी एकूण 204 स्लॉट्स आहेत. 

7/7

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे एकूण 120 कोटी असतात. यापैकी काही पैसे हे खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्च केले जातात आणि इतर रक्कम ही मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी वापरली जाते.  पंजाब किंग्स - 110.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 83 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स - 73 कोटी, गुजरात टायटन्स - 69 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स - 69 कोटी, चेन्नई सुपर किंग्स - 55 कोटी, मुंबई इंडियन्स - 45 कोटी, कोलकाता नाइट राइडर्स - 51 कोटी, सनराइजर्स हैदराबाद - 45 कोटी, राजस्थान रॉयल्स - 41 कोटी.