Suspense Movies: जसं सिनेमात तसंच प्रत्यक्षात घडलं, थरारक चित्रपटाच्या पाच थरारक कथा!

Bollywood Movies Inspired Crime: जर तुम्ही देखील बॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल तर अशा चित्रपटांबद्दल जाणून तुम्हालाही धक्का बसेल, जे पाहिल्यानंतर काही लोकांनी गुन्हा करण्याचे ठरवले. 

Nov 16, 2022, 20:30 PM IST
1/5

bollywood movies inspired crime

मेरठमध्ये 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. या संपूर्ण प्रकरणात मुलाच्या जिवलग मित्राचा हात आहे. जेव्हा या मुलाची हत्या करण्यात आली. तेव्हा त्याचा जिवलग मित्र विवेक ओबेरॉयचा शूटआउट अॅट लोखंडवाला हा चित्रपट रोज पाहत असल्याचं समोर आलं होतं.

2/5

bollywood movies inspired crime

2015 मध्ये भोपाळमधील एका पत्नीने पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. प्रत्यक्षात या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. खुन्याचा शोध घेतला असता, मृतदेह लपवण्यासाठी मारेकऱ्याने अजय देवगणच्या दृष्यम या चित्रपटातून कल्पना घेतल्याचे आढळून आले.

3/5

bollywood movies inspired crime

स्पेशल 26 सारखा मनोरंजक चित्रपट कोण विसरू शकेल? नोटाबंदीनंतर या चित्रपटाने प्रेरित झालेल्या काही लोकांनी सूट-बूट घालून गुन्हेगारीचा मार्ग अवलंबवला. स्वत:ला सीबीआय अधिकारी म्हणवून फसवणूक केली.

4/5

bollywood movies inspired crime

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. बॉलिवूड चित्रपट पोलिसांची भूमिकाही तितक्यात ताकदीने अधोरेखित करतात. गुन्हेगारांच्या गुन्ह्याची उकलही करतात. पण  काही लोक गुन्हेगारीशी प्रेरित होऊन चुकीच्या मार्गावर चालतात.

5/5

bollywood movies inspired crime

श्रद्धा हत्याकांडातही आफताबने डेक्सटर वेब सीरिज पाहून प्रेयसीची हत्या केली होती. वाढत्या गुन्हेगारीच्या घटना खरोखरच लोकांसाठी चिंताजनक आहेत.