Face features and astrology : अशी महिला तुमच्या आयुष्यात आली तर तुमची भरभराट पक्की..

Nov 16, 2022, 17:40 PM IST
1/5

ज्या महिलांचे दात सुंदर, चमकदार, शुभ्र आणि पुढच्या दिशेस झुकलेले असतात अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात. अशा महिलांचं जीवन राजेशाही असतं. हसताना ज्या महिलेचे दात दिसत नाही, गाल फुगीर दिसतात आणि डोळे मिटत नसतील तर ही लक्षणे अतिशय शुभ मानली जातात.

2/5

ज्या महिलांचा गळा चार बोटांएवढा लांब असतो आणि त्यावर तीन रेषा पाहायला मिळतात अशा महिला अतिशय भाग्यवान असतात. अशा महिला धनवान देखील असतात असं बोललं जातं. सोबतच सुंदर आणि गोल आकाराचा गळा महिलांसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

3/5

ज्या महिलांची हनुवटी गोलाकार आणि मऊ असते अशा मुली/महिला  शुभ परिणाम देणाऱ्या मानल्या जातात. दुरीकडे एखाद्या महिलेची हनुवटी खालच्या ओठाच्या खाली आली तर अशा महिला प्रचंड भाग्यवान असतात.

4/5

ज्या महिलांची जीभ लांब, सरळ, पातळ आणि तांब्यासारखी लाल असते अशा महिलांचं जीवन अतिशय सुखद असतं. अशा महिला ज्या घरात जातात तिथे भरभराट होते. अशांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही.

5/5

ज्या मुलींचे गाल गोल आणि हलक्या पिवळ्या रंगाचे असतात अशा महिला अत्यंत लकी मानल्या जातात. अशा महिलांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या नवऱ्याचं भाग्य उजळतं असं बोललं जातं. परिणामी आयुष्यात शुभकाळ सुरू होतो.  (Disclaimer: इथे दिलेली ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. सर्वसामान्य आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ZEE 24 TAAS बातमीतील तथ्यांची पुष्टी करत नाही.)