'या' देशांमध्ये नाही विमानतळ; तरी इथे जाण्यासाठी आतुर असतात जगभरातून पर्यटक

या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती वेळात वेळ काठून कुठेना कुठे फिरायला जाण्याचा प्रयत्न करतो. पण असे काही देश आहेत ज्यांना विमानतळ नाही तरी देखील या देशांमध्ये जाण्यासाठी लोक आतुर असतात. 

| Nov 06, 2024, 17:01 PM IST
1/7

वेटिकन सिटी हा जगातील सगळ्यात छोटा देश आहे. हा देश रोम आणि इटलीमध्ये आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळपास असलेलं जर कोणतं विमानतळ असेल तर ते लियोनार्डो दा विंची-फिमिसिनो हे आहे. हे विमानतळ वेटिकन सिटीपासून जवळपास 30 किलोमीटर लांब आहे.

2/7

सॅन मॅरिनो हे जगातील सगळ्यात जुण्या देशांपैकी एक आहे. हा देश एका डोंगराचा मायक्रोस्टेट आहे, या देशाच्या आजूबाजूला संपूर्ण इटली आहे. इथे पोहोचण्यासाठी जवळचं विमानतळ कोणतं असेल तर ते रिमनी येथे असलेलं फेडेरिको फेलिनी आहे. हे विमानतळ सॅन मॅरिनोशी जवळपास 25 किलोमीटर दूर आहे. 

3/7

लिकटेंस्टीन हा जगातील सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक आहे. स्विट्जरलॅन्ड आणि ऑस्ट्रियामध्ये 160 स्क्वेयर किलोमीटर अंतरात हा देश आहे. इथे पोहोचण्यासाठी जवळचं कोणतं विमानतळ असेल तर ते स्विट्जरलॅन्ड असलेलं ज्यूरिख विमानतळ आहे. 

4/7

मोनॅको या देशात जगातील सगळ्यात महागडे कसीनो, बंदर आणि लोकप्रिय ग्रांड प्रिक्ससाठी लोकप्रिय आहे. इथे पोहोचण्यासाठी 'हड्डा नाइस कोटे डी' अजूर विमानतळाचा वापर तुम्ही करु शकता. हे विमानतळ फ्रान्समध्ये आहे. जे मोनाकोपासून जवळपास 30 किलोमीटर लांब आहे. 

5/7

अंडोरा हा फ्रान्स आणि स्पेनच्यामध्ये पायरेनीस डोंगरांमध्ये असलेलं एक मायक्रोस्टेट आहे. हा देश त्याच्या स्की रिसॉर्ट्स आणि ड्यूटी फ्री शॉपिंगसाठी ओळखला जातो. इथे जाण्यासाठी येणारे पर्यटक हे एकतर फ्रान्सच्या टूलूज-ब्लाग्नैक विमानतळावर किंवा स्पेनच्या बार्सिलोना-एल पॅट विमानतळावरून येतात. 

6/7

कोणत्याही देशात फिरायला जाताना सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेच आहे. त्यात पासपोर्ट, व्हिजा या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

7/7

त्याशिवाय कोणत्याही देशात फिरायला जाताना तिथे कोणत्या महिन्यात जाणं योग्य असतं ते जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.