मांसाहारी लोकांना मटणातून मिळतो Vitamin B12, मग व्हेजिटेरियन लोकांनी काय खावं?

Vitamin B12 : Vitamin B12 हे अधिकतर मांसाहारातून शरीराला मिळत असतं, त्यामुळे शाकाहारी लोकांच्या शरीरात बऱ्याचदा Vitamin B12 ची कमतरता जाणवते. तेव्हा शरीरातील Vitamin B12 ची कमतरता दूर करण्यासाठी शाकाहारी लोकांनी कोणत्या पदार्थांचं सेवन करावं याविषयी जाणून घेऊयात.   

| Jan 08, 2025, 19:17 PM IST
1/7

हिवाळ्याच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात मोहरीच्या पानांची अवाक होत असते. मोहरीची पानं ही व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी १२ ने भरपूर असतात. पालकच्या भाजीचा आहारात विविध प्रकारे समावेश केल्याने Vitamin B12 ची कमतरता जाणवू शकते. 

2/7

पालकमध्ये Vitamin B12 मोठ्या प्रमाणात आढळतं. हिवाळ्याच्या दिवसात याचं सेवन केल्याने शरीरातील Vitamin B12 ची कमतरता दूर होऊ शकते.   

3/7

भोपळ्यात देखील Vitamin B12 चं चांगलं प्रमाण आढळतं. थंडीच्या दिवसात भाजीमंडईत मिळणाऱ्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला Vitamin B12 मिळू शकते. 

4/7

मशरूममध्ये Vitamin B12 आढळते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही मशरूमचे सेवन केल्यास शरीरातील Vitamin B12 ची कमतरता दूर होऊ शकते. 

5/7

Vitamin B12 हे शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जर शरीरात Vitamin B12 ची कमतरता असेल तर लाल रक्तपेशींची कमतरता होऊ शकते, ज्याला ॲनिमिया असे म्हणतात.

6/7

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, मुंग्या येणे आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकते. तेव्हा तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार आहारात Vitamin B12 पूरक पदार्थांचा समावेश करावा. 

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)