भारतातील 'या' गावात सर्वप्रथम उगवतो सूर्य; मध्यरात्री 3 वाजताच...

या गावात सूर्योदयाचा अप्रतिम नजारा पहायला मिळतो. पर्यटक येथे खास सूर्योदय पाहण्यासाठी येतात. 

Nov 09, 2023, 20:01 PM IST

1st Sunrise In India : सूर्योदय पाहिला की दिवस प्रसन्न होतो. साधारण पहाटे पाच नंतर सूर्योदय होतो. मात्र, भारतात एक असे गाव आहे जेथे सर्वप्रथम उगवतो सूर्य. जाणून घेवूया या अनोख्या गावाबद्दल.

1/7

भारतात सर्वात प्रथम सूर्योदय होणारे राज्य अरुणाचल प्रदेश आहे. 

2/7

अतिशय निसर्गसुंदर अशा या गावाची लोकसंख्या फक्त 35 आहे. डोंगचा सूर्योदय पाहण्यासाठी येथून 8 किमीचा ट्रेक करून जावे लागते.

3/7

 येथे 12 तासांचा दिवस असतो.  दुपारी चार वाजताच येथे सूर्यास्त होतो आणि पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्यकिरणे पडतात. पहाटे चार वाजता येथे स्वच्छ उजाडलेले असते.  

4/7

1999 पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले असून देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून सूर्योदय पाहायला येतात.

5/7

यापूर्वी अंदमानच्या कटचल टापूवर सूर्याची पहिली किरणे पडतात असे मानले जात होते. मात्र आता डोंग हे भारतावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे.   

6/7

भारत- चीन- म्यानमार ट्राय जंक्शनवर असलेले हे पिटुकले गाव पृवोत्तर सीमेवरचे भारत हद्दीतले पहिले गाव आहे(Dong Valley – The Land of India’s First Sunlight).  

7/7

अरुणाचल प्रदेश राज्यात असलेल्या डोंग या गावात सर्वप्रथम सूर्य उगवतो. समुद्रसपाटीपासून 1240 मीटर उंचीवर असलेले हे गाव लोहित आणि सती नदीच्या संगमावर बसलेले आहे.