विनातिकीट प्रवास करण्याचा दंड ना हजार ना पाचशे , टीसीने जास्त दंड आकारला तर काय कराल?

 लहान- मोठ्या गावांना शहरांना जोडण्याचे काम रेल्वे करते. दळणवळणाचे सहजसोपे साधन म्हणजे रेल्वे. बहुतांश लोक लांब अंतराच्या प्रवासांसाठी रेल्वेचाच अवलंब करतात. 

Sep 24, 2024, 20:02 PM IST

भारतात दररोज लाखोंच्या संख्येत लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेमुळे प्रवास सोयीस्कर, स्वस्त आणि जलद होतो. म्हणूनच रेल्वेला 'लाईफ लाईन' असे म्हटले जाते. रेल्वे नेटवर्कच्या  आकारानुसार, भारतीय रेल्वे जगातील 'चौथ्या' क्रमांकाचे रेल्वेजाल आहे.

1/8

भारतीय रेल्वे

रेल्वेत फक्त बसायची जागा देणाऱ्या डब्यापासून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देणाऱ्या डब्यापर्यंत विविध प्रकारच्या डब्यांचा समावेश असतो. प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार आणि तिकीट मुल्यानुसार आवडीच्या डब्यात जागा राखीव करत असतो. स्लीपर, एसी, सिटींग अशा प्रकारचे डबे या रेल्वेंमध्ये असतात. 

2/8

जनरलचा डबा

सर्वांत जास्त भरणारा डबा म्हणजे 'जनरल'चा डबा. या डब्यात लोकलसारखी गर्दी असते. त्याचे कारण म्हणजे, या डब्याच्या तिकीटाची किंमत ही इतरांच्या किंमतीपेक्षा फार कमी असते.   

3/8

डब्यांचे प्रकार

रेल्वेला प्रवाशांसाठी 'आरक्षित' आणि 'जनरल' असे दोन प्रकारचे डबे असतात. आधीच तिकीट बुक करणारे प्रवासी आरक्षित डब्यातून, एकदम आरामात प्रवास करतात. पण जे पुर्व तयारीत नसतात किंवा तिकीट आरक्षित करत नाहीत, असे लोक जनरलच्या डब्यातून प्रवास करतात. जनरलचेसुद्धा तिकीट काढणे बंधनकारक आहे पण, ते आयत्यावेळी मिळून जाते. 

4/8

भारतीय रेल्वे नियमावली

भारतीय रेल्वे नियमावलीनुसार, विना तिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जर एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडला गेला, तर त्याला दंड भरावा लागतो. अनेक जणांवर हा दंड भरयची वेळ येते. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे की, या दंडाची किंमत ठरलेली आहे.पण बरेचदा त्याहून जास्त दंड घेतला जातो. 

5/8

एवढी आहे दंड रक्कम

दंडाची रक्कम 250 एवढी आहे. मात्र 250 रक्कमेबरोबरच तुम्ही ज्या स्थानकावर चढलात, त्या स्थानकापासूनचे जेवढे काही भाडे आहे तेवढे पूर्ण भरावे लागते. दंड आणि तिकीट या दोन्ही रक्कमा भरणे बंधनकारक आहे.  

6/8

काळजी घ्या

पण जर टीसी गैरवर्तन करत असेल किंवा दंडाची रक्कम जास्त आकारत असेल, तर तुम्हाला तक्रार नोंदवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तक्रार करण्याचे काही मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या सोयीच्या मार्गाचा अवलंब करू शकता. 

7/8

हेल्पलाईनस्

तक्रार नोंदवण्यासाठी '155210' या क्रमांकावर संदेश पाठवू शकता किंवा 'रेल्वे मदत पोर्टल' वर जाऊन तक्रार नोंदवू शकता. हे दोन्ही मार्ग नको असतील तर www.coms.indianrailways.gov.in या लिंक वर जाऊन तक्रार नोंदवू शकता. रेल्वेत बसल्याबसल्या 182 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. तुमची तक्रार तपासून नंतर योग्य असल्यास कारवाई केली जाईल. 

8/8

तिकीट काढाच

या अशा प्रकरणांपासून वाचण्यासाठी आणि प्रवास सुखाचा व्हावा म्हणून, तिकीट काढूनच प्रवास करा. मात्र जर कधी दंड भरायची वेळ आलीच तर योग्य तेवढी रक्कमच भरा.