सचेत-परंपराच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, गायकाने दाखवली बाळाची पहिली झलक
परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी नुकत्याचं एका गोड मुलाला जन्म दिला आहे आणि त्यांच्या या आनंदाच्या क्षणी ते अत्यंत उत्साही आणि भावुक आहेत. या दोघांनी आपल्या मुलासोबतचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या चाहत्यांना ही सुंदर बातमी दिली.
Intern
| Dec 23, 2024, 14:27 PM IST
1/7

परंपरा आणि सचेत टंडन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते आपल्या नवजात मुलासोबत दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना आपल्या मुलाच्या आगमनाची खुशखबरी दिली आणि एक सुंदर संदेश दिला, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि प्रेमाचा भाव निर्माण झाला.
2/7

3/7

4/7

सचेत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'महादेवाच्या आशीर्वादाने, आमच्या लाडक्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. या सुंदर आणि पवित्र क्षणी, आम्ही तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव, जय माता दी.' या कॅप्शनद्वारे त्यांनी आपल्या आनंदाचा आणि भक्तीचा प्रदर्शन केले.
5/7

6/7
