छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला 348 वर्ष जुना पद्मदुर्ग; अलिबागमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला देतोय टक्कर
मुरुड जंजीराला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीशी लढत-लढतच समुद्रात भव्य किल्ला बांधला.
वनिता कांबळे
| Oct 15, 2024, 23:35 PM IST
Padmadurg Fort Murud Janjira : महाराष्ट्रातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. रायगड जिल्ह्यात असेलला पद्मदुर्ग हा किल्ला नैसर्गिक सौंदर्याची आणि वैभवाची उत्तम झलक दाखवतो. हा किल्ला मुरुड जंजीरा किल्ल्याप्रमाणे भव्य आहे.
1/7

2/7

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये बांधलेल्या सागरी किल्ल्यांपैकी पद्मदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रं दिवस एक करुन, सिद्दीशी लढत-लढतच किल्ल्याची उभारणी केली. किल्ल्याच्या तटबंदीवरून मुरुडचा किनारा, जंजिरा किल्ला आणि सामराजगड किल्ला दृष्टीक्षेपात येतो. तर, या किल्ल्यावरुन सुमद्राचे सुंदर लँडस्केप पहायला मिळते.
3/7

4/7

5/7

6/7
