महाराष्ट्रातील असं मंदिर जिथे रामशिवाय विराजमान आहे सीता, भारतातील एकमेव सीता मंदिर कुठे?

Sita Navami 2024 :  वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला सीता नवमी म्हणजे सीता मातेची जयंती साजरी करण्यात येते. भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रात आहे तुम्हाला माहितीय का?

May 16, 2024, 00:13 AM IST
1/7

सीता मातेच्या या मंदिरात फक्त माता सीतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. रामाशिवाय इथे तुम्हाला सीतेची मूर्ती दिसेल. 

2/7

भारतातील हे एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात आहे. राळेगाव तालुक्यापासून तीन किमी अंतरावरील रावेरी गावात हे मंदिर आहे. 

3/7

सीता मातेच्या या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. रामायणानुसार श्रीरामाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण यांनी माता सीतेला वनवासात ज्याचा उल्लेख दंडकारण्य या भागात सोडलं. 

4/7

रामायणातील दंडकारण्य भाग हेच यवतमाळमधील मंदिर आहे. जिथे लव कुशचा जन्म झाला. अशी आख्यायिका आहे की, रामाने अश्वमेघ यज्ञाचा घोडा सोडला तो या परिसरातच लव कुशने अडवला होता. 

5/7

लव कुश यांच्यापासून घोड्याची सुटका करण्यासाठी मग रामाने हनुमानसह वानरसेनेला पाठवलं. 

6/7

तेव्हा लव कुश यांनी हनुमाजींना बांधून ठेवलं. असं मान्यता आहे की, या परिसरात हनुमानजी आजही त्याच स्थितीत दिसून येतात. 

7/7

हे मंदिर म्हणजे महिलांचं प्रतीक असून हे मंदिर महिलांना जीवन जगण्याची प्रेरणा देतं. मुलांचं संगोपन करु शकतात आणि प्रत्येक नवऱ्याने पत्नीची काळजी घेतली पाहिजे असं मंदिराचं उद्देश आहे.