नुकतीच सुरु झालेली पाळी 10 दिवस लांबतेय, ऋजुताने सांगितलेले 6 पदार्थ खा Periods मध्ये आराम मिळवा
वयात आलेल्या मुलींसाठी मासिक पाळी आणि त्याच्याशी संबंधित त्रास या सगळ्याच गोष्टी नवीन असतात. अशावेळी नेमकं काय करावं कळत नाही. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Sep 01, 2024, 14:03 PM IST
आजकाल खूप कमी वयात मुली वयात येतात. नकळत्या वयात सुरु झालेली मासिक पाळी हा अनेकींना तणाव घेऊन येते. मासिक पाळी दरम्यान शरीरात झालेले बदल आणि त्यावेळी बदलत चाललेली मानसिक स्थिती या सगळ्याच गोष्टी खूप नवीन असतात. अशावेळी नेमकं काय करावं हे कळत नाही. या आणि अशा प्रत्येक प्रश्नावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या तपशीलवार टिप्स.
1/11
मासिक पाळीत किती त्रास होणे सामान्य?
मासिक पाळीत काही प्रमाणात त्रास होणे हे अतिशय सामान्य आहे. पण त्या त्रास होण्याला मर्यादा असणे गरजेचे आहे. अनेक मुलींना मासिक पाळीत खूप त्रास होतो. त्याचे प्रमाण इतके असते की, दर महिन्याला डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरच वाटत नाही. तर हा त्रास अजिबात सामान्य नाही. जसे की, बिछान्यात झोपून राहणे सतत झोपून राहणे मानसिक तणाव जाणवणे ताप येणे स्पोर्ट्स खेळण्याची इच्छा नसणे मासिक पाळी आहे म्हणून पडून राहणे
2/11
मासिक पाळीचा पॅटर्न कसा असावा?
प्रत्येक महिलेचा मासिक पाळीचा एक पॅटर्न असतो. जसे की, पहिल्या दिवशी थोडा रक्तस्त्राव होतो. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी जास्त रक्तस्त्राव होतो. पण त्यानंतर पुन्हा चौथ्या आणि पाचव्या दिवशी कमी रक्तस्त्राव होतो. ही पाच दिवसांची सायकल सामान्य आहे. पण जर तुम्हाला मासिक पाळी 10 दिवस राहत असेल तर मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हा रक्तस्त्राव सामान्य नाही.
3/11
सायकल
4/11
आयर्न कडई-तवा
5/11
स्टील-काचेचे डब्बे
6/11
नाचणीचा लाडू
7/11
मुठभर शेंगदाणे
8/11
लिंबू / आवळा सरबत
9/11
दही / ताक
10/11