टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर?

Hardik Pandya injury : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर आता त्याच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Surabhi Jagdish | Oct 26, 2023, 13:18 PM IST
1/6

वर्ल्डकप स्पर्धा 2023 ऐन मध्यावर आलेली असतानाच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलीये.

2/6

टीम इंडियाचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्याच्या पायाला झालेल्या दुखापतीबाबत गंभीर माहिती समोर आली आहे.

3/6

हार्दिकच्या उजव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. 

4/6

ग्रेड 1 लिगामेंट सरकल्याची शक्यता असल्याने तो पुढचे 3 सामने खेळू शकणार नसल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 

5/6

दरम्यान हार्दिकच्या संदर्भात टीम इंडियाचं मॅनेजमेंट कोणत्याची प्रकारची जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाही.

6/6

हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळाली होती.