Team India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?

Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली. (Team india victory parade in Mumbai)

Saurabh Talekar | Jul 03, 2024, 18:15 PM IST
1/6

टीम इंडिया रवाना

बार्बाडोसमध्ये अडकलेले भारतीय पत्रकारही त्याच विमानाने येत आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.

2/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती देखील शुक्ला यांनी दिली.

3/6

मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम

पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होईल. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.

4/6

रोहित शर्माचं आवाहन

आम्हाला तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडसह हा विजय साजरा करूया, असं आवाहन कॅप्टन रोहित शर्माने मुंबईकरांना केलंय.

5/6

खेळाडूंचा सन्मान

नरिमन पॉईंट येथून रोड शो होईल आणि रोड शोनंतर आम्ही खेळाडूंचा सन्मान करू, अशी माहिती देखील राजीव शुक्ला यांनी दिली.

6/6

125 कोटींची प्राईझ मनी

बीसीसीआयचे सचिव जय शहा टीम इंडियाला जाहीर केलेली 125 कोटींची प्राईझ मनी वितरीत देखील करतील.