विश्वचषक स्पर्धा संपताच आक्रमक फलंदाज अय्यरने उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा नुकतीच संपलीय. अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. स्पर्धा संपून दोन दिवस होत नाहीत तोच टीम इंडियातल्या एका खेळाडूने साखरपूडा उरकून घेतलाय. सोशल मीडियावर त्याने फोटो शेअर केलेत.

राजीव कासले | Nov 22, 2023, 14:02 PM IST
1/8

आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपताच टीम इंडियातल्या एका खेळाडूचा साखरपुडा पार पडला. आपल्या साखरपुड्याचे फोटो या खेळाडूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

2/8

टीम इंडियाचा खेळाडू आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज व्यंकेटश अय्यरचा साखरपुडा संपन्न झाला. श्रुती रघुनाथन असं व्यंकटेशच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. 

3/8

व्यंकटेश अय्यरने इन्स्टाग्राम अकाऊंवर फोटो शेअर केले असून यात व्यंकटेशने हिरव्या रंगाचा कुर्ता तर श्रृतीने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. 

4/8

व्यंकटेशने एक कॅप्शन लिहिला असून यात त्याने म्हटलंय, 'आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज' या पोस्टनंतर चाहत्यांना व्यंकटेश आणि श्रुतीला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत

5/8

टीम इंडियाचे खेळाडू अर्शदीप सिंह, आवेश खान, मनदीप सिंह, श्रेयस अय्यर, नमन ओझा आणि युजवेंद्र चहल या खेळाडूंनी व्यंकटेशाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

6/8

व्यंकटेश अय्यर भारतासाठी 2 एकदिवसीय आणि 9 टी20 सामने खेळला आहे. फलंदाजीबरोबरच व्यंकटेश मध्यमगती गोलंदाजदेखली आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5 विकेट आहेत.

7/8

आयपीएलमध्ये केकेआरसाठी व्यंकटेशने दनदार कामगिरी केलीय. एक शतकही त्याच्या नावावर आहे. व्यंकटेशची होणारी पत्नी श्रुती फॅशन डिझायनर आहे. 

8/8

श्रुतीने पीएसजी कॉलेजमधून बॉ.कॉमचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर तीने फॅशन मॅनेजमेंटमधून मास्टर डिग्री पूर्ण केली. कर्नाटकात ती लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चेंडाइज प्लानर म्हणून काम करते.