बाबरच काय युवराजलाही धोबीपछाड... Hitman रोहितने 92 रन्स करत मोडले 'हे' 10 मोठे विक्रम

Rohit Sharma Broke 10 Records In 92 Runs Inning: रोहित शर्माने भारतीय संघाने आक्रमक खेळावं अशी अपेक्षा सामन्याआधी व्यक्त केलेली आणि आक्रमक कसं खेळतात हे कर्णधार म्हणून त्याने स्वत:ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं. अवघ्या 8 धावांनी शतक हुलकं असलं तरी रोहितच्या 92 धावांच्या खेळीने तब्बल 10 विक्रम मोडीत काढले आहेत. हे विक्रम कोणते ते पाहूयात...

| Jun 25, 2024, 14:09 PM IST
1/12

Rohit Sharma Broke 10 Records

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या विजयात कर्णधार रोहितने मोलाचा हातभार लावला.

2/12

Rohit Sharma Broke 10 Records

प्रथम फलंदाजी करण्यास निमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या कर्णधाराने 41 बॉलमध्ये 92 धावांची तुफानी खेळी केली. अवघ्या 8 धावांनी त्याचं शतक हुकलं.

3/12

Rohit Sharma Broke 10 Records

रोहितने त्याच्या तुफान खेळीमध्ये 7 चौकार आणि 8 षटकार लगावले. कोणत्याही टी-20 वर्ल्ड कप सामन्यामध्ये एकाच खेळीत भारतीयाने लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. कोणत्या संघाच्या खेळाडूने एकाच डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.

4/12

Rohit Sharma Broke 10 Records

तसेच या 8 षटकारांच्या मदतीने रोहित शर्माने अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये  200 षटकारांचा टप्पा ओलांडला. अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 200 षटकार लगावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितच्या नावावर 203 षटकार आहेत. सिक्स मारण्याचा विचार केला तर रोहित जगात भारी खेळाडू आहे असं म्हणता येईल.

5/12

Rohit Sharma Broke 10 Records

37 वर्षीय रोहित शर्माने 19 बॉलमध्ये अर्थशतक झळकावलं. त्याच्या टी-20 करिअरमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं.

6/12

Rohit Sharma Broke 10 Records

रोहित शर्माचं हे अर्धशतक टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने झळकावलेलं सर्वात वेगवान अर्धशथक ठरलं. यापूर्वी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्याने 2007 मध्ये 20 बॉलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावलेलं.

7/12

Rohit Sharma Broke 10 Records

20 चेंडूंच्या आत अर्धशतक झळकावणाऱ्या 7 खेळाडूंमध्ये रोहितचा समावेश झाला आहे. रोहित या यादीतील दुसरा खेळाडू आहे. याआधी युवराज सिंगने 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलेलं. त्यापूर्वी युवराजनेच 2007 मध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावत अवघ्या 12 बॉलमध्ये अर्धशतकं झळकावलं होतं.

8/12

Rohit Sharma Broke 10 Records

आपल्या 92 धावांच्या खेळीने रोहित शर्माने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. 4165 धावा करत सध्या रोहित टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

9/12

Rohit Sharma Broke 10 Records

रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या नावावर आता 1154 धावा आहेत. केवळ विराट कोहली त्याच्याहून पुढे असून विराटच्या नावावर 1207 धावा आहेत.

10/12

Rohit Sharma Broke 10 Records

92 धावांसहीत टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये 191 धावा केल्यात. त्याच्या मागोमाग ऋषभ पंत (167) आणि सूर्यकुमार यादव (149) यांचा क्रमांक लागतो.

11/12

Rohit Sharma Broke 10 Records

92 धावांची खेळी करत रोहितने अंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्ड कपमधील आपली सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे. तर सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी आहे. 2010 मध्ये सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं होतं. 

12/12

Rohit Sharma Broke 10 Records

रोहित शर्माने मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये 29 धावा केल्या. ही मिचेलच्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील सर्वात महागडी ओव्हर ठरली. तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने टाकलेली ही दुसरी सर्वात महागडी ओव्हर ठरली, यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलने 2023 साली भारताविरुद्ध 30 धावा दिलेल्या.