Yashasvi Jaiswal Net Worth : आलिशान कार अन् मुंबईत 5 BHK घर, यशस्वी जयस्वालची एकूण संपत्ती किती?

Yashasvi Jaiswal Net Worth : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) स्थान देण्यात आलंय. यशस्वी जयस्वाल पहिल्यांदाच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करेल. 

Saurabh Talekar | May 28, 2024, 23:26 PM IST
1/7

यशस्वी जयस्वाल

यंदाची आयपीएल यशस्वी जयस्वालसाठी खास ठरली नाही. काही सामन्यात त्याला चांगली सुरूवात करून देखील मोठा धावसंख्या उभी करता आली नाही.

2/7

संधीचं सोनं

मात्र, रोहित शर्मासोबत डावखुरा सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालला संधी मिळालीये. याच संधीचं सोनं यशस्वी जयस्वालला करावं लागणार आहे.

3/7

यशस्वीचा प्रवास

मुंबईतील झोपडपट्टीपासून ते टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास कधीच सोपा नव्हता. अनेक कठीण परिस्थितीतून जयस्वालने आपला रस्ता तयार केला अन् तो यशस्वी देखील झाला.

4/7

क्रिकेटमधून पैसा

यशस्वी वयाच्या 12 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला. आयपीएलमधून आणि क्रिकेटमधून पैसा आल्यानंतर आता यशस्वीचं आयुष्य पलटलंय.

5/7

5 बीएचके फ्लॅट

नुकतंच यशस्वीने मुंबईत आलिशान 5 बीएचके फ्लॅट घेतला. राजस्थान रॉयल्सने 2020 मध्ये यशस्वीला 2 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. 

6/7

बीसीसीआय

राजस्थान रॉयल्सने 2022 मध्ये 4 कोटीच्या बदल्यात यशस्वीला रिटेन केलं होतं. तर बीसीसीआय यशस्वीला दरवर्षी 3 कोटी देतं. तसेच तो जाहिरातीतून देखील पैसा कमावतो.

7/7

एकूण नेट वर्थ

यशस्वीकडे आलिशान कार देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जयस्वालची एकूण नेट वर्थ 10.73 कोटी आहे. त्यानुसार तो प्रत्येक महिन्याला 35 लाख कमावतो.