फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? 

Sep 16, 2023, 20:47 PM IST

Sweet Tamarind Benefits for Health : चिंचात अनेक गुणधर्म आहेत. त्यातून चिंच खाल्ल्यानं आपल्याला अनेक गोष्टींचाही फायदा होऊ शकतो. तेव्हा या लेखातून आपण हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नक्की चिंचाचे आपल्याला कुठल्या रोगांसाठी फायदा होतो? 

1/6

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

chinch

आपण अनेकदा पाहतो की गरोदर महिला या नेहमी चिंच खाण्याची आवड असते. गरोदर महिलांसाठी ते फायदेशीरही असते. उलट्या किंवा मळमळ होत असेल तर महिला या चिंचाचे सेवन करतात. त्यातून पाचन प्रक्रियाही सुधारते. 

2/6

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

chinch fayde

परंतु फक्त गरोदर महिलाच नाही तर या काही प्रकृतीच्या व्यक्तींनीही चिंचाचे सेवन करावे, जे तुमच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते. चिंचामुळे रक्ताच्या अभावाची समस्या दूर होते. त्यातून अशक्तपणा दूर होतो कारण यात लोहाची मात्रा अधिक असते. यात व्हिटॅमिन सी असते ज्यानं तुमची प्रतिकारशक्ती सुधारते. 

3/6

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

chinch fayde news

लोहसोबतच कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-दमॅथॅटिक गुणधर्मही चिंचात असतात. 

4/6

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

tamarind news

आपण चिंचाचा वापर चटणी, सॉस, आमटी, भाजी यांतही करतो. तापासाठीही चिंचाचा वापर केला जातो. याचे सूप करून तुम्ही पिऊ शकता. त्यातून या सुपात तुम्ही मिरपुडही टाकू शकता. 

5/6

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

benefits of tamarind

अॅलर्जी, सूज आणि खाज अशा काहींवरही चिंचाचे सेवन करणे हे फायदेशीर ठरते. श्वसनाचे आणि घशाचे काही त्रास असतील तरीही चिंच फायद्याचे ठरते. 

6/6

फक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे

benefits of tamarind in marathi

मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल यांच्यासाठीही चिंच फायदेशीर ठरते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)