PHOTO : 11 अफेअर करुनही अविवाहित, 24 व्या वर्षी झाली 2 मुलींची आई, जाहिरातीसाठी घेते 1.5 कोटी रुपये, अभिनेत्रीची संपत्ती जाणून व्हाल थक्क
Entertainment : फोटोमधील दिसणाऱ्या अभिनेत्रीचा आज 19 नोव्हेंबरला 48 वा वाढदिवस साजरा करतेय. या अभिनेत्रीचं 11 दिग्गज लोकांसोबत नावा जोडल्या गेलं. तरीदेखील ती आज अविवाहित आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, लग्न न करताही दोन मुलींची आई आहे.
नेहा चौधरी
| Nov 19, 2024, 01:00 AM IST
1/14

2/14

झालं असं की, मिस इंडियाचा ताज पटकावला तेव्हा तिची प्रतिस्पर्धी होती ऐश्वर्या राय. पण जेव्हा मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी फिलिपाइन्सला जायचं होतं तेव्हा तिचा पासपोर्ट हरवला. त्यावेळी आयोजक ऐश्वर्या रायला पाठवण्याचा विचार होते. तेव्हा सुष्मिता चिडली तिने कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने मिस इंडियाचा ताज जिंकला होता. त्यामुळे ही संधी दुसऱ्या कोणाला मिळणार ही तिला मान्य नव्हतं. तिने वडिलांना स्पर्धेबद्दल सांगितलं आणि त्यांनी त्याचा पासपोर्टची व्यवस्था केली. अशा प्रकारे सुष्मिता स्पर्धेत पोहोचली आणि तिने इतिहास रचला.
3/14

सुष्मिता सेन तिच्या लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत राहिली. अभिनेत्रीचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते. आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि फरारी ललित मोदी यांच्यासोबत डेट करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या मोदीने असं लिहिलं होतं की, मालदीव आणि सार्डिनियानंतर ते नुकतेच लंडनला परतला आहे. माझी बेटर हाफ सुष्मिता सेन देखील आहे. आमचा नवा प्रवास सुरू होणार आहे. पण आजपर्यंत त्यांनी लग्न केलं नाही.
4/14

5/14

6/14

7/14

होय, सुष्मिता सेनच्या लव्ह लाईफमध्ये रणदीप हुडाचे नावही सामील आहे. कर्मा और होळीच्या सेटवर रणदीप आणि सुष्मिता यांची भेट झाली होती. दोघांमधील संपर्क वाढला आणि नंतर त्यांच्या जवळीकीच्या बातम्याही समोर आल्या होत्या. असं म्हटलं जातं की, दोघांनी जवळपास 3 वर्षे एकमेकांना डेट केलं आणि नंतर त्यांचे नातं तुटलं.
8/14

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सुष्मिता सेन 36 वर्षांची होती, तेव्हा तिचं नाव बिझनेसमन इम्तियाज खत्रीसोबत जोडलं गेलं होतं. त्यावेळी खत्री हा अवघ्या 22 वर्षांचा होता. दोघेही एकदा रॅम्प वॉक करताना दिसले होते. जेव्हा मीडियाने त्यांच्या अफेअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा दोघांनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
9/14

अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमच्या प्रेमात पडली होती. असं म्हटलं जात होतं की वसीम आणि सुष्मिता सेन एकमेकांच्या प्रेमात इतके पडले होते की ते लग्न करणार होते, मात्र नंतर त्यांच्या आयुष्यात काही समस्या आली आणि ते वेगळे झाले. पण जेव्हा-जेव्हा सुष्मिताला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने ही अफवा असल्याचे सांगितले.
10/14

11/14

12/14

13/14
