Records... Records अन् Records... सूर्या तळपला अन् विक्रमांचा पालापाचोळा झाला; विक्रमांची यादी पाहाच

Records Broken By Suryakumar Yadav: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये लय गवसली. पहिल्या 2 सामन्यांमध्ये नावाला साजेशी कामगिरी न करता आलेल्या सूर्यकुमारने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीची पिसं काढली. या खेळीत सूर्यकुमारने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. त्यावरच नजर टाकूयात...

Swapnil Ghangale | Aug 09, 2023, 10:42 AM IST
1/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये 44 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसहीत 83 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजविरुद्ध कोणत्याही भारतीय फलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

2/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी करत केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने 14 चेडूंमध्ये 64 धावा कुटल्या. यामध्ये 4 उत्तुंग षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.

3/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार पूर्ण केले आहेत. षटकारांचं शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. तर जागतिक स्तरावर असा पराक्रम करणारा तो 13 वा खेळाडू ठरला आहे.

4/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमारआधी हा पराक्रम रोहित शर्माने आणि विराट कोहलीने केला आहे. रोहितच्या नावावर 182 षटकार आहेत. तर विराटच्या नावावर 117 षटकार आहेत. मात्र या दोघांच्याही तुलनेने सूर्यकुमार यादव या यादीत अधिक सरस ठरला आहे.

5/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

विराट आणि रोहित शर्मापेक्षा 360 डिग्री फटकेबाजी करणारा सूर्यकुमार सरस ठरल्याचं कारण कमी चेंडूंमध्ये त्याने हा विक्रम केलाय. म्हणजेच सर्वात जलद गतीने 100 षटकारांचा टप्पा ओलांडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार पहिल्या स्थानी आहे.

6/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमारने आपल्या 49 व्या डावामध्ये 100 षटकारांचा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. जागतिक स्तरावर सूर्यकुमारपेक्षा कमी सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवणारा केवळ एक खेळाडू आहे.

7/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

इव्हिन लुईसने हा विक्रम 42 सामन्यांत नोंदवला आहे. वेगाने 100 षटकार झळकावण्याबाबतीत सूर्यकुमार यादव हा विराट आणि रोहितच्याही पुढे गेला आहे.

8/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. 83 धावांच्या खेळीमुळे त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे.

9/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

83 धावांच्या या खेळीनंतर सूर्यकुमारने 51 सामन्यांमधील 49 डावांत 1780 धावा केल्या आहेत. भारताकडून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे सूर्यकुमारपेक्षा पुढे आहेत.

10/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

धवनने भारतासाठी 1,759 धावा केल्यात. विराटने सर्वाधिक 4,008 धावा, रोहितने 3,853 धावा, के. एल. राहुलने 2,265 धावा भारतासाठी खेळताना केल्या आहेत. सूर्यकुमारने 1,780 धावा करत धवनला मागे टाकलं.

11/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध वेस्ट इंडीजमध्येच सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भरातीयांच्या यादीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानी आला आहे.

12/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

सूर्यकुमारने या देशात यजमानांविरोधात 2 अर्धशतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावलं आहे.

13/13

Suryakumar Yadav Records TOP Stats And Numbers From India Vs West Indies 3rd T20

भारताने तिसऱ्या टी-20 मध्ये यजमानांना 7 गडी राखून पराभूत केलं. 5 सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जिंकून भारताने मालिका 1-2 वर आणली आहे.