Railway Job: रेल्वेत तब्बल अडीच लाख पदे रिक्त, जाणून घ्या तपशील

देशातील सर्वात मोठा कर्मचाऱ्यांची संख्या असलेला केंद्रीय विभाग म्हणून रेल्वेची ओळख आहे. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेल्वेमध्ये एकूण 11.75 लाख कर्मचारी होते, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर उत्तर देताना सांगितलं. अधिसूचनेनुसार, लेव्हल-1 पदांसाठी एकूण 1 लाख 47 हजार 280 उमेदवार निवडले गेले आहेत. भारतीय रेल्वेवरील ग्रुप 'ए' सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने यूपीएससीद्वारे केली जाते. यूपीएससी आणि डीओपीटीकडे मागणी करण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Aug 09, 2023, 09:26 AM IST

Indian Railway Job: देशातील सर्वात मोठा कर्मचाऱ्यांची संख्या असलेला केंद्रीय विभाग म्हणून रेल्वेची ओळख आहे. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेल्वेमध्ये एकूण 11.75 लाख कर्मचारी होते, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर उत्तर देताना सांगितलं. अधिसूचनेनुसार, लेव्हल-1 पदांसाठी एकूण 1 लाख 47 हजार 280 उमेदवार निवडले गेले आहेत. भारतीय रेल्वेवरील ग्रुप 'ए' सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने यूपीएससीद्वारे केली जाते. यूपीएससी आणि डीओपीटीकडे मागणी करण्यात आली आहे.

1/8

Railway Job: रेल्वेत तब्बल अडीच लाख पदे रिक्त, जाणून घ्या तपशील

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

Railway Job: देशभरातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतरत्र नोकरीसाठी अर्ज केला असाल. 

2/8

बेरोजगारांना नोकरीची संधी

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

पण भारतीय रेल्वेअंतर्गत शेकडो, हजारो नव्हे तर तब्बल अडीच लाख पदे रिक्त आहेत. ही पदभरती पूर्ण केल्यास देशातील अडीच लाख बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

3/8

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची माहिती

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली. रेल्वेच्या सर्व झोनमध्ये ग्रुप सी पदांवर 2 लाख 48 हजार 895 पदे रिक्त आहेत. 

4/8

ग्रुप ए आणि बी

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

तर ग्रुप ए आणि बी मध्ये 2070 पदे रिक्त आहेत.एकूण 1 लाख 28 हजार 349 उमेदवारांना ग्रुप 'C' पदांसाठी (स्तर-1 वगळून) निवडण्यात आले असल्याची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

5/8

सर्वात मोठी कर्मचाऱ्यांची संख्या

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

देशातील सर्वात मोठी कर्मचाऱ्यांची संख्या असलेला केंद्रीय विभाग म्हणून रेल्वेची ओळख आहे. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेल्वेमध्ये एकूण 11.75 लाख कर्मचारी होते, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर उत्तर देताना सांगितलं.

6/8

ग्रुप 'ए' सेवा

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

अधिसूचनेनुसार, लेव्हल-1 पदांसाठी एकूण 1 लाख 47 हजार 280 उमेदवार निवडले गेले आहेत. भारतीय रेल्वेवरील ग्रुप 'ए' सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने यूपीएससीद्वारे केली जाते. यूपीएससी आणि डीओपीटीकडे मागणी करण्यात आली आहे.

7/8

लेव्हल-1 पदे

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

30 जून 2023 पर्यंत 1 लाख 28 हजार 349 उमेदवारांना 'ग्रु सी' पदांवर (स्तर-1 वगळून) नोटिफिकेशनशिवाय नियुक्त करण्यात आले आहे. तर 1 लाख 47 हजार 280 उमेदवारांना लेव्हल-1 पदांसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

8/8

रिक्तपदांची संख्या

Indian Railway Job Group C Various posts are vacant know the details

1 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त होती. या तुलनेत रेल्वेच्या सध्याच्या एकूण रिक्तपदांची संख्या 2.5 लाख इतकी कमी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.