गरम चहा थंडगार करून पिणं करा बंद; नकळत आरोग्याचं होतंय नुकसान

काही लोकांना अनेकदा थंड चहा गरम केल्यानंतर पिण्याची सवय असते, जो त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, कारण चहा थंड झाल्यावर त्याचे चांगले गुणधर्म नष्ट होतात.

| Dec 23, 2023, 10:58 AM IST
1/7

थंड चहाचे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. 

2/7

थंड चहा प्यायल्याने अपचन होऊ शकतं. शिवाय यामुळे पचनसंस्थाही कमकुवत होण्याची शक्यता असते.

3/7

चहामध्ये कॅफिन असल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो. 

4/7

चहामध्ये असलेली साखर देखील तुमचे वजन वाढवू शकते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू शकते.

5/7

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटीसह अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला पोटात जळजळ होऊ शकतं.

6/7

तुम्हाला चहा बनवून 10-15 मिनिटं झाली असतील तर तुम्ही तो गरम करून पिऊ शकता, परंतु यास जास्त वेळ लागू नये कारण यामुळे चहामध्ये बॅक्टेरिया होऊ शकतात जे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

7/7

चहा बराच वेळ थंड झाला तर त्यातील चांगली संयुगं नष्ट होतात. जेव्हा आपण तो थंड चहा पितो तेव्हा त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ लागते.