रणबीर कपूरला अंगा खांद्यावर खेळवणारी 'ही' अभिनेत्री करणार 4 वर्षानंतर कमबॅक; पाहा कोण आहे ती?

Guess the Bollywood Actress: 4 वर्षांच्या ब्रेकनंतर सोनम कपूर ब्लाइंड (Blind) या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.

Jun 29, 2023, 23:37 PM IST

Sonam kapoor new movie: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याची बालमैत्रिण सोनम कपूर (Sonam Kapoor New Movie) हिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल चार वर्षाच्या ब्रेकनंतर सोनम कपूर ओटीटीच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार आहे.

1/5

7 जुलैला ओटीटीवर प्रदर्शित

आता 4 वर्षांच्या ब्रेकनंतर सोनम कपूर ब्लाइंड (Blind) या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. हा चित्रपट 7 जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.  टीझरमध्ये सोनम एका अंध मुलीच्या भूमिकेत दिसत आहे.

2/5

गरोदरपणाच्या आधी शूटिंग

सोनम कपूरने 2022 मध्ये तिचा मुलगा वायुला जन्म दिला. गरोदरपणात कोणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला होता. सोनमनं ब्लाइंड चित्रपटाचं (Sonam Kapoor Blind Movie) शूटिंग गरोदरपणाच्या आधी केलं होतं.

3/5

चित्रपटाचं शूटिंग ग्लासगोमध्ये

ब्लाइंड या चित्रपटाचं शूटिंग ग्लासगो येथे झाले आहे. या चित्रपटात सोनमसोबतच विनय पाठक आणि लिलेट दुबे  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 39 दिवसात शूट करण्यात आला होता. 

4/5

हर्षवर्धन कपूर

सोनम कपूरचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबईत झाला. सोनम कपूरच्या मांडीवर बसलेला मुलगा तिचा धाकटा भाऊ हर्षवर्धन कपूर आहे. सोनमने पडद्यामागील असिस्टंट म्हणून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

5/5

सावरिया

सोनम कपूरने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात रणबीर कपूर देखील होता. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सोनमने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय