10 तासांंपेक्षा अधिक झोपणार्‍यांना 'या' आजाराचा धोका

Jun 18, 2018, 16:11 PM IST
1/5

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

झोप आरोग्यासाठी हितकारी आहे. मात्र अतिझोप काही आजारांना निमंत्रण देते. 10 तासांपेक्षा अधिक झोपल्याने मेटॅबॉलिक सिंड्रोम वाढतात तर हृद्याशी निगडित काही आजार बळावण्याचा धोका वाढतो.  

2/5

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

नियमित 10 तासांंपेक्षा अधिकवेळ झोपल्यास पोटाजवळचा घेर वाढणं, ट्राइग्लिसराइडची पातळी वाढणं, मेटॅबॉलिक सिंड्रोम वाढतो. सोबतच हृद्यविकार बळावतो. यामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. 

3/5

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

स्त्री आणि पुरूष या दोघांमध्येही अधिक वेळ झोपल्याने शरीरात ट्राइग्लिसराड वाढण्याचा धोका असतो. महिलांमध्ये यामुळे लठ्ठपणा वाढतो, रक्तातील साखरेचे प्रमाण, चांगले कोलेस्ट्रेरॉल कमी होते. 

4/5

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

संशोधकांच्या दाव्यानुसार, सहा तासांपेक्षा कमी झोपणार्‍या पुरूषांंमध्ये मेटॅबॉलिक सिंड्रोम वाढतो. स्त्री, पुरूषांंमध्ये पोटाजवळील चरबी वाढते. 

5/5

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

sleeping for more than 10 hours can cause you heart disease

दक्षिण कोरियाच्या सियोल नेशनल यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनचे मुख्य लेखक क्लेयर ई किम यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोप आणि मेटॅबॉलिक सिंड्रोम यांंचा एकमेकांंवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.