Shiv Jayanti Wishes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, शिवजयंतीनिमित्त पाठवा मराठमोळे मॅसेज, कोट् आणि प्रेरणादायी विचार

Happy Shiv Jayanti Wishes in Marathi:छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. आज त्यांची जयंती. यानिमित्त आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा मराठमोळा मॅसेज आणि द्या करा मानाचा मुजरा. 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर सर्व भारतीयांचे जगभरातील सर्व लोकांचे प्रेरणास्थान आहेत. पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे ज्वलंत प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमानाचे प्रतीक आहेत. 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने जवळच्या व्यक्तींना पाठवा शिवजयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा आणि संदेश.

1/12

किती राजे आले आणि किती राजे गेले पण तुमच्या सारखे कोणी नाही… छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा  

2/12

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अफजल खान फार झाले आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला! शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

3/12

"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!" शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/12

एक मराठा लाख मराठा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

5/12

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,  शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/12

जगणारे ते मावळे होते  जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन  जनतेवरुन मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता  शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

7/12

श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग... देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

8/12

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!  

9/12

स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस  मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा  असा वाघिणीचा होता तो छावा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

10/12

निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,  छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

11/12

चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा, एकच होता असा राजा,  नाव त्याचं घेऊ किती  म्हणतात त्याला छत्रपती! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

12/12

शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे,  क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे... जय शिवराय!