Namo Shetkari Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांच्या खात्याते येणार 12 हजार रुपये; शिंदे फडणवीस सरकारची नमो योजना
Shetkari Samman Nidhi Yojana: केंद्राच्या धर्तीवर राज्यातही नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली जाणार आहे. शेतक-यांना अतिरिक्त 6 हजार रुपये मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.
Namo Shetkari Samman Nidhi Yojana : राज्यातल्या शेतक-यांसाठी दिलासा देणारी घोषणा सरकारने केली आहे. राज्यातल्या शेतक-यांना आता अतिरिक्त सहा हजार रुपये मिळणार आहे.. केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना शेतक-यांसाठी आहे. त्याला पूरक म्हणून राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना आखण्यात आलीय. तेव्हा राज्यातल्या शेतक-यांना केंद्राचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत.

