'एखादी व्यक्ती समोर नसताना शरीरसंबंध...'; शेखरने सांगितली 'हिरामंडी'मधील 'त्या' सीनची खरी गोष्ट
Shekhar Suman Manisha Koirala Viral Scene In Heeramandi: सध्या सोशल मीडियावर 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजची तुफान चर्चा आहे. मात्र वेब सिरीजमधील पहिल्याच भागातील एक सीन सध्या बराच चर्चेत आहे. हा सीन शेखर सुमन आणि मनिषा कोइरालावर शूट करण्यात आला आहे. मात्र हा सीन शूट करताना नेमकं काय घडलं याबद्दल शेखरनेच माहिती दिली आहे. त्याने या सीननंतर सेटवरील सर्वजण येऊन त्याला थँक यू का म्हणाले हे ही सांगितलं आहे. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊयात..
Swapnil Ghangale
| May 04, 2024, 15:12 PM IST
1/11
अभिनेता शेखर सुमन सध्या संजय लिला भंन्सालींच्या पहिल्याच वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमध्ये शेखर सुमनने दिलेल्या एका आव्हानात्मक दुष्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. सेटवरील कर्मचाऱ्यांना संजय लिला भंन्सालींना त्यांच्या वेब सिरीजमध्ये हे असलं काहीतरी हवं असेल यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना सर्वांना या सीनबद्दल ऐकून आधी धक्काच बसला.
2/11
मात्र शेखर सुमन आणि मनिषा कोइरालावर चित्रित करणयात आलेला हा सीन एका टेकमध्ये शूट करुन पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी शेखरचे आभार मानल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. शेखर सुमन यांनी पहिल्याच टेकमध्ये हा सीन व्यवस्थित शूट केला नसता तर संजय लिला भंन्साली यांनी त्यांच्या मनाप्रमाणे तो शूट होईपर्यंत शुटींग सुरुच ठेवलं असतं असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असल्याचं शेखर म्हणाला.
3/11
या सीनमध्ये शेखरने साकारलेलं नवाब हे पात्र मद्य धुंदावस्थेत दाखवण्यात आलं आहे. अशा अवस्थेतच नवाब या कथेतील मल्लिकाजानबरोबर एका घोडागाडीतून जात असतो. मलिल्काजानची भूमिका अभिनेत्री मनिषा कोइरालाने साकारली आहे. कथेनुसार संधी साधून नवाब मलिल्काजानचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार असतो. मात्र तो एवढ्या धुंदीत असतो की त्याला ती नेमकी कुठे बसली आहे हेच दिसत नसतं. त्यावेळेस नवाब मल्लिकाजानकडे पाठ करुन असतो तेव्हा त्याला आपण मल्लिकाजानबरोबर शारीरिक संबंध ठेवत असल्याचं वाटतं आणि तिथेच त्याचं विर्यसख्खलन होतं.
4/11
भंन्सालींनी दिग्दर्शित केलेल्या या वेबसिरीजमधील हा अनस्क्रीप्टेड सीन होता असं शेखरने 'झूम इन्टर्टेनमेंट'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मात्र याबद्दल भंन्साली यांनी शेखरबरोबर वरवर चर्चा केली होती. तसेच हा असला सीन करायला तुला काही हरकत नाही याबद्दल विचारणाही केलेली. त्यावेळेस शेखरने हा सीन गंभीर वाटण्याऐवजी मजेदार वाटून फज्जा उडू शकतो अशी शंका बोलून दाखवली होती. मात्र शेखरने आपल्या अभिनयाच्या जोरावर हा सीन अगीद उत्तम रित्या केला.
5/11
"मी पूर्ण तयारी करुन गेलो. मी माझे संवाद पाठ केले होते. या सीनचं शुटींग सुरु होण्याच्या काही क्षण आधीच त्यांनी (भंन्सालींनी) मला हाक मारली आणि "मी याचा वेगळाच संदर्भ देण्याचा विचार केला आहे. तुला हे करायला चालेल ना?" असा प्रश्न विचारला," असं शेखरने सांगितलं. त्यानंतर त्यांनी या सीनचा संदर्भच बदलून टाकला. कोणी याचा विचारही केला नव्हता. सहाय्यक दिग्दर्शकांनाही याचं मोठं आश्चर्य वाटल्याचं शेखरने सांगितलं.
6/11
भंन्साली सतत विचार करत होते. या दृष्यामध्ये नवाब या घोडागाडीत बसून लघवी करत होता आणि तो ग्लानित असतानाच मलिल्काजानबरोबर संबंध ठेवत असल्याचा अनुभव घेत होता. भंन्साली यांनी आता नवाब मलिल्काजानकडे पाठ फिरवतो आणि ती मागे बसलेली असतानाही समोर बसल्यासारखं वाटून आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. शेखरला भंन्सालींचं म्हणणं पटतं आणि सीन शूट करायचं ठरलं.
7/11
खरं तर हा या सीनचा अगदीच वेगळा अर्थ काढण्यात आला होता. यापूर्वी कोणीही असं केलेलं नव्हतं. कोणीतरी समोर नसताना समोर एखादी व्यक्ती असल्याचा भास झाल्याने शरीरसंबंध ठेवतोय हे या दृष्यामधून दाखवायचं होतं. "जर तू नाही म्हणालास तरी मला चालेल. तुला हे विचित्र वाटत असेल तर नको करुयात," असा पर्यायही भंन्सालींनी आपल्याला दिल्याचं शेखरने सांगितलं.
8/11
मात्र वेगळं काहीतरी करायला मिळतंय असा विचार करुन शेखरने हा सीन शूट करण्यास होकार दिला. "मी त्यांना म्हणालो की, या आयुष्यात काहीही विचित्र नसतं. मी हे करेन." त्यानंतर हा सीन पहिल्या टेकमध्ये शूट करुन पूर्ण झाला. मद्यपान केल्याचे सीन शूट करणं कठीण असतं कारण यात तुम्हाला अतीशयोक्ती करावी लागते किंवा आहे त्यापेक्षा कमी शुद्धीत असल्यासारखं वागावं लागतं," असं शेखर म्हणाला.
9/11
"या सीनमध्ये मी अचानक वळून मी लैंगिक सुख मिळवत असल्याचं दाखवू शकलो असतो. मात्र मी ते पात्र समजून घेतलं आणि त्या सीनचं गांभीर्य राखण्याचा तो कथेला सजेसा वाटेल असा प्रयत्न केला. या दृष्यामधून नवाबच्या व्यक्तीमत्वाची छटा दाखवण्याचा मी प्रयत्न केला. एक श्रीमंत व्यक्ती अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागत असल्याचं मला दाखवायचं होतं. म्हणून मी तो थोडा असंवेदनशीलपणे वागतोय अशापद्धतीने अभिनय करत शूट केला" असं शेखर म्हणाला.
10/11