Shark Tank India चा हा जज राजासारख जगतोय, Net Worth ऐकूण धक्का बसेल

Anupam Mittal Net Worth: शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तलची (Anupam Mittal)चर्चा सुरू झाली आहे. हे अनुपम मित्तल कोण आहेत, व त्याची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात. 

Jan 07, 2023, 19:24 PM IST

Anupam Mittal Net Worth:शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India) या शोने मालिका विश्वात मोठा धूमाकूळ घातला होता. अचानक आलेल्या या शोने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या शोने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. आता या शोचा दुसरा सीझन येत आहे. या सीझनची चर्चा असतानाच आता शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तलची (Anupam Mittal)चर्चा सुरू झाली आहे. हे अनुपम मित्तल कोण आहेत, व त्याची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊयात. 

1/5

Anupam Mittal

अनुपम मित्तल (Anupam Mittal) हे एक यशस्वी उद्योगपती आहेत. पण शार्क टँक इंडियाने त्यांना मोठी ओळख दिली. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये अनुपम जजच्या भूमिकेत होते. आता दुसऱ्या सीझनमध्ये देखील ते दिसणार आहेत.

2/5

Anupam Mittal

अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांचा दक्षिण मुंबईत आलिशान बंगला आहे. या बंगल्याची झलक त्याच्या इंस्टाग्रामवर अनेकदा पाहायला मिळते. या आलिशान बंगल्यात ते पत्नी आंचल आणि मुलीसह मुंबईतील मेहरानाज सोसायटीत राहतात. या बंगल्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

3/5

Anupam Mittal

अनुपम मित्तल (Anupam Mittal) ज्या इमारतीत राहतात त्या इमारतीचा दर 48,000 रुपये प्रति चौरस फूट आहे. त्यामुळे अनुपम यांच्या बंगल्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या बंगल्याची किंमत यापेक्षाही जास्त असू शकते.

4/5

Anupam Mittal

बंगल्याचा आतील भाग अतिशय सुंदर आहे. भिंतीला महागड्या पेंटिंग्जने सजवलेले आहे, तर घराच्या कानाकोपऱ्यात ठेवलेल्या जगभरातील निवडक वस्तू या घराला आणखी आलिशान बनवतात. 

5/5

Anupam Mittal

अनुपम मित्तलच्या (Anupam Mittal) एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर ती 185 कोटी आहे. तो Shaadi.com, makaan.com, mouj मोबाईल अॅपचा मालक असताना, तो पीपल ग्रुपचा संस्थापकही आहे.