Sharda Sinha News : ‘मैंने प्यार किया’ पासून ‘गँग्स ऑफ वासेपूर’ पर्यंत, छठ पूजेच्या ‘फाल्गुनी पाठक’ शारदा सिन्हा

Sharda Sinha News : बिहारच्या लोक गायिका शारदा सिन्हा यांची काही दिवसांपूर्वी तब्येज बिघडली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 25 ऑक्टोबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती, मात्र अचानक तब्येत पुन्हा बिघडल्यानं त्यांना व्हेंटिलेटवर शिफ्ट करण्यात आलं. 

| Nov 05, 2024, 12:05 PM IST
1/7

पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या शारदा सिन्हा यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1952 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी भोजपूरी आणि मैथिली गाणी गायली आहेत. त्या बिहारच्या कोकीळा म्हणून ओळखल्या जातात. 

2/7

शारदा यांच्याशिवाय छठ पूजा ही अपूर्ण आहे असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांना शारदा सिन्हा यांना छठ पूजेच्या ‘फाल्गुनी पाठक’ म्हणून लोक ओळखतात. त्यांनी छठ पूजेशिवाय अनेक बॉलिवूड गाणी गायली आहेत. त्यांच्या या अल्बममध्ये 8 गाणी आहेत. 

3/7

शारदा यांनी त्यांच्या करिअरमध्ये छठ या सणाविषयी जवळपास 62 गाणी गायली आहेत. त्यांची ही गाणी दरवर्षी छठ पुजेच्या वेळी उत्तर भारतात ऐकायला मिळतात. 

4/7

शारदा सिन्हा यांनी सलमान खान आणि भाग्यश्रीच्या 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील ‘कहे तोसे सजना’ हे गाणं गायलं. याशिवाय सलमान खानच्या आणखी एका चित्रपटासाठी त्यांनी गाणं गायलं आहे. 'हम आपके हैं कौन...' या चित्रपटातील 'बाबुल जो तुमने सिखाया' हे गाणं गायलं आहे.

5/7

‘गँग्स ऑफ वासेपूर’ साठी देखील शारदा सिन्हा यांनी गाण गायलं आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल की कोणतं गाणं त्यांनी गायलं? तर 'तार बिजली' हे गाणं त्यांनीच गायलं आहे. 

6/7

शारदा यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय 2018 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देत त्यांना त्यांच्या याच कार्यासाठी सन्मानित करण्यात आलं. 

7/7

शारदा यांचे पती दिवंगत राजकारणी ब्रज किशोरी सिन्हा यांचं ब्रेन हॅमरेजमुळे याचवर्षी सप्टेंबरमध्ये निधन झालं होतं. शारदा आणि ब्रज किशोरी सिन्हा यांना दोन मुलं आहेत. मुलाचं नाव अंशुमान आहे तर लेकीचं नाव वंदना आहे.