बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

Oct 19, 2019, 22:55 PM IST
1/8

महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष अविस्मरणीस व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात असून असून याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चित्रपटसृष्टी आणि कलाजगतातील विविध दिग्गजांशी संवाद साधला.

2/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

या कार्यक्रमाला अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, जॅकी श्रॉफ, अभिनेत्री कंगना रनौट, जॅकलिन फर्नांडिस, निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर, बोनी कपूर, राजकुमार हिरानी, अनुराग बसू, इम्तियाज अली, आनंद एल. राय यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

3/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

काही दिवसांपूर्वीच महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती पार पडली होती. गांधी जयंतीचे हे वर्ष संस्मरणीय व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. 

4/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

यासाठी बॉलिवूड विश्वातील जाणकारांची मते जाणून घेता यावीत, यासाठी 'चेंज विदीन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

5/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७, लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. 

6/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

चित्रपट तसेच छोट्या पडद्यावरही विविध माध्यमांतून गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुकोद्गार काढले.

7/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

यावेळी कलाकारांनी मोदींसोबत फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. 

8/8

बॉलिवूड इंडस्ट्री मोदींच्या भेटीला...

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे बॉलिवूड जगताकडून स्वागत करण्यात आले आहे.