New Parliament : नवीन संसद भवन पाहा कसे असणार? पहिले फोटो आलेत समोर

Inside Picture of New Parliament:  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसद भवनात सादर करण्याची जास्त शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. नव्या संसदेच्या लोकसभा सभागृहाच्या कामाचे फोटोसमोर आलेत. अर्थसंकल्पावर शेवटची नजर टाकण्यासाठी बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. 

| Jan 19, 2023, 14:10 PM IST
1/5

See Inside Picture of New Parliament Loksabha Hall Know Details

नवीन संसद भवनाचे दालन  (New Parliament) तयार आहे. लोकसभा सभागृहाच्या आतील फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये लोकसभा अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे संयुक्त अभिभाषण करण्याची तयारी करत आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही  (Budget Session)  संसदेच्या नवीन सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. 

2/5

See Inside Picture of New Parliament Loksabha Hall Know Details

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात सादर करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळी नवीन इमारतीत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे. 

3/5

See Inside Picture of New Parliament Loksabha Hall Know Details

नवीन संसद भवन (New Parliament) सध्याच्या संसद भवनापेक्षा मोठे, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. 64,500 चौरस मीटरमध्ये बांधले जाणारे नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट करत आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीमध्ये दृकश्राव्य प्रणाली तसेच डेटा नेटवर्क सुविधेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. 

4/5

See Inside Picture of New Parliament Loksabha Hall Know Details

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1,224 खासदार बसण्याची व्यवस्था असणार आहे. म्हणजेच एकावेळी 1,224 खासदार बसू शकतात. यामध्ये लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत मध्यवर्ती हॉल असणार नाही. दोन्ही सभागृहांच्या खासदारांना लोकसभेच्या सभागृहातच बसता येणार आहे. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे. 

5/5

See Inside Picture of New Parliament Loksabha Hall Know Details

संसदेच्या नवीन इमारतीत (New Parliament) लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. नवीन चार मजली संसद भवन बांधण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.