थरकाप उडवणाऱ्या Horror Movies; एकट्याने हे चित्रपट पाहण्याआधी अनेकदा कराल विचार

Scariest Horror Movies: आपल्यापैकी अनेकांना चित्रपट पहायला आवडतात. मात्र अनेकदा काही हॉरर चित्रपट पाहताना थरकाप अडतो. लहानपणी भयपट पाहताना वाटणारी भीती अनेकांच्या मनात मोठं झाल्यानंतरही कायम असते. बरेचसे असे चित्रपट आहेत जे लहानांनाच काय तर वयस्कर लोकांनाही एकट्याने पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय आणि हृदयाची धडधड वाढल्याशिवाय राहत नाही. अशाच काही भयपटांची यादी पाहूयात...

Swapnil Ghangale | Jun 27, 2023, 16:02 PM IST
1/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

मनोरंजन असं म्हटलं की सर्वात आधी ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ती गोष्ट म्हणजे चित्रपट. जगभरामध्ये अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट तयार केले जातात. हे चित्रपट वेगवेगळ्या जेनरचे म्हणजेच वेगवगेळ्या थीमवर आधारित असतात. त्यामध्ये कॉमेडी, रोमॅन्टीक, सस्पेन्स, थ्रीलर यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो. प्रत्येक जनेरचा आपआपला प्रेक्षक वर्ग असला तरी सस्पेन्स आणि थ्रीलर चित्रपट पाहताना अनेकांची बोबडी वळते.

2/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

आपल्यापैकी काही जणांनी लहानपणी अगदी चादरीमध्ये लपून वगैरे भुतांचे किंवा थ्रीलर चित्रपट पाहिले असतील. मात्र अनेकांना आजही थ्रीलर चित्रपट एकट्याने पाहताना भीती वाटते. अशाच काही थरारक चित्रपटांबद्दल आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत. हे असे चित्रपट आहेत जे एकट्याने पाहण्याआधी नक्कीच तुम्ही दोनदा विचार कराल....

3/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

'हेरिडिटी' हा चित्रपटही या भयानक चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका लहान मुलीला भूतं दिसण्यासंदर्भात आहे.

4/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

1980 साली प्रदर्शित झालेला 'द शायनिंग' हा चित्रपट आजही सर्वात थरारक भीतीपटांपैकी एक मानला जातो.

5/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

सर्वात रहस्यमय आणि पाहताना भीती वाटेल अशा चित्रपटांच्या यादीमध्ये 'द कॉन्ज्युरिंग' या चित्रपटाचाही समावेश होतो.

6/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

'पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी' हा चित्रपटही एकटण्याने पाहताना भीती वाटेल अशा चित्रपटांपैकीच आहे. या चित्रपटाची कथा एका जोडप्याच्या अवतीभोवती फिरते. 

7/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

1973 साली प्रदर्शित झालेला 'एक्सोरसिस्ट' हा हॉलिवूडमधील सर्वात थरारक आणि अंगावर काटा आणणारा चित्रपट समजला जातो. या चित्रपटाने चांगली खळबळ उडवली होती.

8/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

'एक्सोरसिस्ट' चित्रपटाने त्या काळी बॉक्स ऑपिसवर 441.3 मिलियन डॉलर कमाई केली होती. या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 8 रेटिंग आहेत.

9/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

भयपटांच्या या यादीमध्ये 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'हॅलोविन' या चित्रपटाचा उल्लेख केला नाही तर ही यादी अपूर्ण ठरेल.

10/10

scariest horror movies of Hollywood you will surely not watch alone

वर नमूद केलेल्या या चित्रपटांपैकी तुम्ही किती चित्रपट पाहिले आहेत हे कमेंट करुन नक्की सांगा. तसेच तुम्हाला यापैकी कोणता चित्रपट पाहायला आवडेल तेही कळवा.