Sankashti Chaturthi 2024 : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीला करा 'हे' उपाय!

Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : विघ्नहर्ता गणेशाला चतुर्थी समर्पित आहे. त्यामुळे महिन्यातील विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला व्रत करुन गणेशाची पूजा केली जाते. आयुष्यातील सर्व संकटं आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. (Sankashti Chaturthi 2024 Do These Remedies on Dwijapriya Sankashti Chaturthi to Improve Financial Status dwijapriya sankashti chaturthi upay in marathi)

Feb 26, 2024, 12:48 PM IST
1/7

फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणेशाला तिळाचं लाडू अर्पण करण्यात येतात. त्याशिवाय तीळ दान केल्यामुले सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे. 

2/7

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला पहाटे 1:53 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 वाजेपर्यंत आहे. 

3/7

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला पूजेच्या वेळी लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, मोदक, पान, सुपारी, धूप इत्यादी अर्पण करण्यात येतं. 

4/7

कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी बाप्पाला 21 लाडूचा प्रसाद अर्पण करा. त्याशिवाय ऊं ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: मंत्राचा जप करा. 

5/7

त्याशिवाय द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तृतीय पंथींना इलायची, वस्त्र यांचा दान करा.   

6/7

द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 5 दुर्वाच्या 11 गांठ लाल कपड्यामध्ये बांधा आणि ते बाप्पाला अर्पण करा. त्यानंतर गणेशाच ध्यान करा. या उपायामुळे आर्थिक स्थिती सुधारते, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.  

7/7

गणरायाला तुळशी पानाशिवाय कुठल्याही इतर गोष्टी अर्पण करु नका. खास करुन पांढरं चंदन न वापरता पिवळं चंदनाचा उपयोग करावा. बाप्पाला जेवण खूप प्रिय आहे त्यामुळे त्यांना सांगरसंगीत नैवेद्य बनवावे. यात सुखलेले आणि तुटलेले तांदूळ वापरु नका. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)