सचिन पायलट आणि सारा पायलट यांची लव्हस्टोरी

Dakshata Thasale | Dec 12, 2018, 16:18 PM IST
1/7

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयाचे जादूगार युवा नेता सचिन पायलट ठरले आहे. निकालानंतर सचिन पायलट यांची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. पण सचिन पायलट हे एका वेगळ्या कारणामुळे देखील आता चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांच्या लव्हस्टोरीमुळे. 

2/7

सचिन पायलट यांनी कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुलाह यांच्या मुलीशी सारा अब्दुलाहशी प्रेमविवाह केला आहे. सारा अब्दुलाह या एका अभिनेत्रीला देखील लाजवतील इतक्या सुंदर आहेत. 

3/7

7 सप्टेंबर 1977 मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेता राजेश पायलट यांच्या घरी सचिन पायलट यांचा जन्म झाला. राजस्थान काँग्रेसच्या राजकारणात एका नव्या चेहऱ्याच जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

4/7

राजकारणाच्या पिचवर सिक्सर मारणारे सचिन पायलट यांची प्रेमकहाणी वेगळी आहे. सचिन यांनी कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुलाह यांच्या मुलीशी साराशी लग्न केलं आहे. सारा या दिसायला अतिशय सुंदर, ग्लॅमरस आहेत. 

5/7

अनेक कट्टरतावादी लोकांनी यांच्या प्रेमाला कडाडून विरोध केला. अनेकांनी या नात्यावर नाराजगी दर्शवली. तसेच सचिन पायलट आणि सारा या दोघांच्या कुटुंबियांना देखील त्यांच हे नातं पसंत नव्हतं. 

6/7

कुटुंब आणि समाजाला न जुगारता अनेक संकटांना सामोरं जात या दोघांनी जानेवारी 2004 मध्ये अतिशय साधेपद्धतीने लग्न केलं. तर दुसरीकडे कश्मीरमध्ये या लग्नाला कडाडून विरोध झाला. 

7/7

सचिन पायलट तेव्हा 26 वर्षांचे होते. लग्नानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले सुद्धा. सारा यांच्यासोबतीने राजकारणातील यश पादाक्रांत करायला त्यांनी सुरूवात केली.